28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेषमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन आता सुसाट; प्रकल्पाचे १०० टक्के भूसंपादन पूर्ण

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन आता सुसाट; प्रकल्पाचे १०० टक्के भूसंपादन पूर्ण

कामाला आता गती मिळणार

Google News Follow

Related

देशातील पहिल्या मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळणार आहे. या प्रकल्पातील एक टप्पा पूर्ण झाला आहे. या प्रकल्पाचे १०० टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. सोमवार, ८ जानेवारी २०२४ पर्यंत महाराष्ट्र, गुजरात, दादरा नगर हवेली येथील बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी १,३८९.४९ हेक्टर जागेचे संपादन करण्यात आले आहे. दरम्यान, आवश्यक असलेल्या जमिनीचा ताबा मिळाल्याने, पुढील कामे वेगात सुरू होणार आहेत, अशी माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (एनएचएसआरसीएल) देण्यात आली आहे.

गेल्या एका वर्षांत बुलेट ट्रेनला आवश्यक असलेल्या जागेपैकी १.१२ टक्के जागा ताब्यात घेणे बाकी राहिले होते. मात्र, ते आता पूर्ण झाले असून ती जागा ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाला एक वर्षाचा कालावधी लागला. मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी राज्यात ४३०.४५ हेक्टर जमिनीची आवश्यकता होती. जानेवारी २०२३ मध्ये ४३०.४५ हेक्टर जमिनीपैकी ४२५.२४ हेक्टर (९८.७९ टक्के) जमिनीचे संपादन करण्यात आले. तर, गुजरातमध्ये ९५१.१४ हेक्टर जमिनीपैकी ९४०.७७ हेक्टर (९८.९१ टक्के), तर दादरा नगर हवेलीमध्ये ७.९० हेक्टर जमिनीचे संपूर्ण भूसंपादन केले होते.

डिसेंबर २०२३ मध्ये गुजरातमध्ये १०० टक्के, दादरा नगर हवेली १०० टक्के आणि महाराष्ट्रात ९९.८३ टक्के भूसंपादन झाले होते. त्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये ठाणे जिल्ह्यामधील काही भागातील जागा संपादित करून, राज्यातीलही १०० टक्के जमीन नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिपत्याखाली आली आहे.

केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१६ रोजी नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) ची स्थापना केली. यामध्ये देशभरात बुलेट ट्रेनचे जाळे बनविण्यासाठी, प्रकल्पांची आखणी व अंमलबजावणी करण्याचे काम या कंपनीकडे सोपवले. या कंपनीने देशातील पहिली मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम हाती घेतले आहे. मात्र गुजरात, महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेलीमधील जमीन ताब्यात घेण्यास विलंब होत होता.

हे ही वाचा:

‘ईजमायट्रिप’ने स्थगित केल्या मालदिवच्या सर्व विमानाचे बुकिंग!

मराठा आंदोलकांना लगाम घालण्यासाठी याचिका

मालदीवमधले लोकंही गुगलवर सर्च करतायत ‘लक्षद्वीप’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळाले अयोध्येचे निमंत्रण…

प्रकल्पाची सद्यस्थिती –

  • राज्यात मुंबई एचएसआर स्थानकाचे काम सुरू झाले. ९९ टक्के ‘सेकंड पाइल’चे काम पूर्ण झाले आहे. तसेच इतर भागात खोदकाम सुरू आहे. राज्यातील बोईसर, विरार आणि ठाणे येथील कामे हाती घेण्यात आली आहेत.
  • मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर २१ किमी लांबीचा वांद्रे-कुर्ला संकुल ते शीळफाटा बोगदा असणार आहे. २१ किमी बोगद्यापैकी ठाणे खाडीतील ७ किमी लांबीचा देशातील पहिला समुद्राखालील बोगदा ठरणार आहे.
  • पायाभूत कामे करताना निर्माण होणारा आवाज कमी करण्यासाठी वायडक्टच्या (लांबलचक पूल) दोन्ही बाजूला ध्वनी अडथळे उभे केले जात आहेत.
  • जपानच्या शिंकानसेन मध्ये वापरल्या जाणाऱ्या एमएएचएसआर कॉरिडॉर ट्रॅक सिस्टीम साठी पहिले प्रबलित काँक्रीट (आरसी) ट्रॅक बेड टाकण्याचे काम सुरत आणि आणंद येथे सुरू झाले आहे. भारतात पहिल्यांदाच जे- स्लॅब बॅलेस्टलेस ट्रॅक सिस्टमचा (खडीविरहित) वापर केला जात आहे.
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा