राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. अशातच मनोज जरांगे यांनी येत्या २० जानेवारीला मुंबईमध्ये येत उपोषण करणार असल्याचं सांगितलं आहे. मनोज जरांगे यांनी सर्व मराठा समाजाला मोठ्या संख्येने आझाद मैदानावर येण्याचं आवाहन केलं आहे. यातच जरांगे पाटील यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. मनोज जरांगे यांनी २० तारखेला मुंबईत आंदोलन करु नये यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्ते हेमंत पाटील यांच्याकडून याचिका दाखल झाली आहे.
ओबीसी आणि मराठा दोन्ही समाजाने आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी मागितली आहे. याच दिवसापासून दोन्ही समाजाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. यामुळे दोन्ही समाज समोरासमोर येऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. मुंबईकरांना याचा नाहक त्रास होईल. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या शहरावर याचा परिणाम पडेल. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर न्यायालयाने योग्य निर्णय द्यावा, असं हेमंत पाटील यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणारे मालदीवचे तीन मंत्री निलंबित
मालदीव मंत्र्यांच्या आक्षेपार्ह टिप्पणीबाबत स्थानिक नेत्यांमध्येच रोष
वसंत मार्वलमध्ये अय्यप्पा पूजनातून एकात्मतेचा संदेश
‘श्री राम घर आये’ गाण्याने पंतप्रधान मोदी प्रभावित!
मनोज जरांगे यांनी जेव्हा जेव्हा आंदोलन केली तेव्हा सरकारने त्यांच ऐकलं. मात्र आता मनोज जरांगे पाटील हे मुंबईला वेठीस धरायला निघाले आहे. त्याला आम्ही आक्षेप घेतलाय आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मनोज जरांगे आणि ओबीसी समाज यापैकी कुणालाही आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी देऊ नये ही मागणी केली असल्याचं हेमंत पाटील यांनी म्हटलं आहे.