27 C
Mumbai
Monday, December 15, 2025
घरविशेष“ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या हल्ल्यांमध्ये १०० दहशतवाद्यांचा खात्मा”

“ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या हल्ल्यांमध्ये १०० दहशतवाद्यांचा खात्मा”

सर्वपक्षीय बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली माहिती

Google News Follow

Related

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने ७ मे रोजी मध्यरात्री अवघ्या २५ मिनिटांत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ला केला. या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या मुख्यालयासह नऊ दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे उध्वस्त करण्यात आली. या हल्ल्यानंतर एअर स्ट्राईकची माहिती देण्यासाठी म्हणून केंद्र सरकारने गुरुवारी सकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी राजकीय पक्षांच्या नेत्यांना ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली. पाकिस्तानमधील दहशतवादी तळांविरोधातील कारवाईबद्दल माहिती देण्यात आली तसेच ही एक चालू असलेली कारवाई असून याचे अधिकचे तपशील देण्याचे त्यांनी टाळले. संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय हल्ल्यांमध्ये किमान १०० दहशतवादी मारले गेले. पुढे त्यांनी म्हटले की, भारत परिस्थिती वाढवू इच्छित नाही, परंतु जर पाकिस्तानने काही केले तर आम्ही मागे हटणार नाही.

महत्त्वाची बाब म्हणजे सर्वपक्षीय बैठकीत असलेल्या सगळ्याच पक्षांनी सरकारच्या पाकिस्तानविरोधी भूमिकेला पाठिंबा दिला आहे. या बैठकीत मंत्री राजनाथ सिंह आणि किरण रिजेजू यांनी महत्त्वाची माहिती दिली. या बैठकीला राजनाथ सिंह यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि इतर काही मंत्री उपस्थित होते. तसेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार मल्लिकार्जुन खरगे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत यांच्यासह प्रमुख विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांचे नेते उपस्थित होते.

हे ही वाचा..

‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानचा शेअर बाजार ढासळला

सेनाप्रमुखांनी लान्स नायक दिनेश कुमार यांच्या शौर्याला दिली सलामी

पंजाबमधील फिरोजपूर सेक्टरमध्ये बीएसएफने पाकिस्तानी घुसखोराला केले ठार

“कसोटी सिंहासन रिकामं – गिल की बुमराह?”

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, सर्व राजकीय पक्षांनी सरकारला पाठिंबा दर्शविला आहे. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असल्याचे सांगण्यात आले. सर्वपक्षीय बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकारतर्फे माध्यमांना निवेदन देताना म्हटले की, सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. सर्व नेत्यांनी परिपक्वता दाखवत कोणतीही टीका-टिप्पणी केली नाही. ही बैठक एका व्यापक राजकीय हेतून घेतली गेली होती, जिचा उद्देश सफल झाला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा