28 C
Mumbai
Saturday, December 6, 2025
घरविशेषमहाराष्ट्रात आत्तापर्यंत पुरामुळे १३८ जणांनी गमावले प्राण

महाराष्ट्रात आत्तापर्यंत पुरामुळे १३८ जणांनी गमावले प्राण

Google News Follow

Related

मुसळधार पावसाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली. राज्यात दरडी कोसळण्याचे सत्र अद्यापही सुरूच आहे. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला मृतांची संख्या १३८ वर पोहोचली आहे. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार पूरग्रस्त भागातून सुमारे १ लाख ३५ हजार लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. २४ जुलै रोजी रात्री ९.३० वाजताच्या आकडेवारीनुसार पूरग्रस्त भागातून सुमारे १ लाख ३५ हजार लोकांना स्थळांतरीत करण्यात आले आहे. तसेच दरडी पडून एकूण ११२ मृत्यू तर ३ हजार २२१ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. एकूण ५३ नागरिक जखमी झाले असून, अद्यापही ९९ बेपत्ता आहेत. अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाच्या मार्फत देण्यात आली.

दरम्यान, महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. स्थानिक पूर कधी ओसरणार याचीच वाट पाहात आहेत. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. घरामध्ये पाणी शिरून अनेकांचा संसार उद्धवस्त झाला आहे. तसेच शेतातही पाणी शिरल्यामुळे पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.

हे ही वाचा:

…तर मीराबाईचे रौप्यपदक होणार सोनेरी

मुख्यमंत्री साहेब, तुम्ही हात जोडू नका!

भाजपा नगरसेवक पूरग्रस्तांना करणार सढळ हस्ते ही मदत

आव्हाड, कोकण महाराष्ट्रात आहे, ते दुसऱ्याचे घर नाही!

अनेक शहरांमधील बाजारपेठा पाण्याखालीच आहेत. त्यामुळे स्थानिकांना आता पाणी ओसरल्यानंतर नव्या आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. एनडीआरएफ भारत हवामान खात्याच्या (आयएमडी) हवामान अंदाज आणि केंद्रीय जल आयोगाच्या अहवालाचा सतत मागोवा घेत आहे आणि त्यानुसार बचाव कार्य सुरू आहे. तसेच सध्याच्या घडीला मुंबई-बेंगळुरू महामार्ग पूरामुळे वाहतुकीसाठी बंद झालेला आहे.

मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पालघर, रायगड, सहारा, सांगली, सिंधुदुर्ग नगर आणि कोल्हापुरात मदत आणि बचाव कार्यात सध्या एनडीआरएफची पथके कार्यरत आहेत. कोलकाता आणि वडोदरा येथून प्रत्येकी चार चमू महाराष्ट्रात दाखल झालेले आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा