27 C
Mumbai
Thursday, December 18, 2025
घरविशेषमयांक यादवच्या वेगवान गोलंदाजीने बेंगळुरूच्या प्रेक्षकांमध्ये सन्नाटा!

मयांक यादवच्या वेगवान गोलंदाजीने बेंगळुरूच्या प्रेक्षकांमध्ये सन्नाटा!

मयांकच्या चेंडूचा वेग १५६.७ किमी प्रति तास

Google News Follow

Related

लखनऊच्या मयांक यादव याने केलेल्या वेगवान गोलंदाजीने बेंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवरील प्रेक्षकांमध्ये सन्नाटा पसरला. मयांक याने यावेळी १५६.७ किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी करून या हंगामातील सर्वांत वेगवान गोलंदाजीची नोंद केली. लखनऊने या सामन्यात बेंगळुरूचा पराभव केला.

मयांकने याच हंगामातील सामन्यात १५० किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी करून तीन महत्त्वाच्या विकेट घेऊन अवघ्या २७ धावा दिल्या होत्या. या जोरावर लखनऊला पंजाबविरोधात पहिल्या विजयाची नोंद करता आली. त्याच्या या कामगिरीमुळे क्रिकेटचे महारथी ब्रेट ली आणि डेल स्टेन यांनीही त्याची दखल घेऊन त्याचे कौतुक केले.

मयांक याने १५१ किमी प्रति वेगाने गोलंदाजी करून ग्लेन मॅक्सवेल याला शून्यावर बाद केले आणि सर्व स्टेडिअमवर शुकशुकाट पसरला. नंतर त्याने कॅमरून ग्रीन यालाही तंबूत पाठवले. मयांकच्या वेगवान गोलंदाजीमुळे बेंगळुरूच्या फलंदाजांनाही त्यांच्या व्यूहरचनेत बदल करण्यास भाग पडले.

हे ही वाचा:

दिल्ली जल मंडळ घोटाळ्यातील लाचेची रक्कम ‘आप’च्या निवडणूक निधीसाठी!

एक काळ असा होता जेव्हा नेहरू म्हणाले होते ‘भारत दुसरा, चीन पहिला’

“संजय राऊतांनी स्वतःची शिवसेना संपवून राष्ट्रवादी संपवली आता काँग्रेसही संपवतायत”

अनिल परबांच्या दापोलीमधील साई रिसोर्टवर हातोडा!

मयांकने पंजाबविरुद्धच्या सामन्यात जॉनी बेअरस्टो, प्रभासिमरन सिंग आणि जितेश शर्मा यांना बाद केले होते. त्याच्या संपूर्ण चार षटकांतील गोलंदाजीचा वेग १५० किमी प्रति तास आणि त्यापुढेच होता. त्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला होता.

मयांक यादव हा दिल्लीचा तरुण क्रिकेटपटू आहे. आयपीएल २०२२च्या हंगामात लखनऊने त्याला आपल्या संघात घेतले. लखनऊचा प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी या तरुण गोलंदाजाचे कौतुक केले आहे. ‘इंग्लंडच्या मार्क वूड आमच्यासोबत नसल्याने आमचे नुकसान होऊ शकले असते, मात्र संपूर्ण संघाने आपल्यातली ताकद दाखवून दिली आहे,’ असे कौतुक लँगर याने केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा