अमेरिकेतून एका भीषण विमान अपघाताची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (अमेरिकेची वेळ) वॉशिंग्टनमधील रीगन नॅशनल एअरपोर्टवर लँडिंग करताना एका प्रवासी विमान आर्मीच्या ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरला धडकले आणि पोटोमॅक नदीत कोसळले. या दुर्घटनेनंतर जवळच्या पोटोमॅक नदीत मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. सध्या १८ मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
या घटनेनंतर विमानतळावरून विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंगची सेवा बंद करण्यात आली आहे. या अपघातानंतर अग्निशमन दल आणि आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून ते मदत आणि बचाव कार्य करत आहेत. या अपघाताबाबत सविस्तर माहिती मिळणे बाकी आहे.
हे ही वाचा :
तेव्हा चप्पल सोडली आज ठाकरेंनाही सोडलं!
कोर्टाने निर्णय दिलाय आता तरी भोंगे उतरवा!
घाटकोपर पोलिसांकडून १२ बांगलादेशींना अटक!
‘अमेरिकन एअरलाइन्स’ या विमान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, विमानात ६० प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. विमानतळावरील विमानांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. व्हाईट हाऊस आणि कॅपिटलच्या दक्षिणेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावर ही घटना घडली.
यूएस आर्मीच्या अधिकाऱ्याने पुष्टी केली की, प्रवासी विमानाची धडक झालेले लष्करी हेलिकॉप्टर प्रशिक्षणासाठी निघाले होते. हेलिकॉप्टरमध्ये तीन सैनिक होते, मात्र अद्याप त्यांची माहिती समोर आलेली नाही. धडाक होण्याचे नेमके कारण अद्याप अज्ञात आहे. फेडरल एव्हिएशन ऑथॉरिटी (एफएए) ने सांगितले की त्यांनी चौकशी सुरू केली आहे आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाने सांगितले की ते या घटनेबद्दल अधिक माहिती गोळा करत आहेत.