31 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरविशेष१२ मार्च १९९३: १० हजार पानी आरोपपत्र, १०० दोषी, १४ फाशी

१२ मार्च १९९३: १० हजार पानी आरोपपत्र, १०० दोषी, १४ फाशी

राकेश मारिया यांनी केला तपास आणि दाखल केले आरोपपत्र

Google News Follow

Related

स्फोटकांनी भरलेली बेवारस स्कूटर आणि मारुती व्हॅन हा मुंबईत झालेल्या १२ बॉम्बस्फोटाचा पहिला पुरावा होता. पोलीस तपासात ही व्हॅन माहीम भागातील एका पत्त्यावर रुबिना मेमनच्या नावाने नोंदणीकृत होती. पोलीस माग काढत या पत्यावरच्या आठ मजली इमारतीतीच्या ठिकाणी पोहोचले पण घराला कुलूप होते.

स्फोटाच्या दोन दिवसांपूर्वी मेमन कुटुंबीय परदेशात गेले होते. पोलिसांनी तपास केला असता काही काळ क्रिकेटपटू असलेला अब्दुल रज्जाक मेमन येथे टायगर, याकूब, सुलेमान, ईशा, युसूफ आणि अयुब या पाच मुलांसह राहत असल्याचे आढळून आले. त्यानंतर तपास पथकांनी १७ राज्यांतील ८० शहरांमध्ये छापे टाकून १८० संशयितांना अटक करण्यात आली… मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी एका मुलाखतीमध्ये ही आठवण सांगितली होती.

१९९३मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा तपास मुंबई पोलिसांसाठी नक्कीच आव्हानात्मक होता. कारण एक नाही दोन नाही तर तब्बल १२ स्फोट मुंबईच्या वेगवेळ्या भागात झाले होते. मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनी या स्फोटाच्या तपासाची जबाबदारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्यावर सोपवली. त्यावेळी वाहतूक विभागाची जबादारी सांभाळत असलेले राकेश मारिया यांच्या नेतृत्वाखाली १५० पेक्षा जास्त पोलिसांची पथके नियुक्त करण्यात आली होती.

हे ही वाचा:

‘त्या’ जोडप्याचा भांग पिऊन बाथरुममध्ये झाला मृत्यू

६२ वर्षे झाली, आता ऑस्करविजेते रेड कार्पेटवरून चालणार नाहीत

१२ मार्च १९९३… ३० वर्षांनंतर मोदींनी चव्हाट्यावर आणला व्होरा समितीचा अहवाल….

तेजस्वी यादव, लालू यादवांच्या मुलींच्या घरातून मिळाली रोकड, २ किलो सोने

स्फोटकांनी भरलेल्या स्कूटर आणि व्हॅनच्या पहिल्या पुराव्यानंतर तपासाला वेग आला. तपास पूर्ण झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी ४ नोव्हेंबर १९९४ मध्ये मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले. हे आरोपपत्र १० हजार पानांचे होते. जवळ २२ वर्ष टाडा न्यायालयात मुंबई सुनावणी सुरू होती. त्यानंतर २००६ मध्ये, ६०० लोकांच्या साक्षीनंतर, न्यायालयाने मुख्य आरोपी टायगर मेमनचा भाऊ याकूब मेमन आणि संजय दत्त यांच्यासह १०० लोकांना दोषी ठरवले, तर २३ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १४ दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यापैकी याकूब मेमनला २०१५ मध्ये फाशी देण्यात आली आहे. अबू सालेमसह २२ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अवैध शस्त्रास्त्र प्रकरणात संजय दत्तने शिक्षा पूर्ण केली आहे. अब्दुल कय्युम या आरोपींपैकी एकाची जून २०१७ मध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. सध्या या प्रकरणात टायगर मेमन आणि दाऊद इब्राहिमसह २७ आरोपी फरार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा