33 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरविशेष१२ मार्च १९९३ : काला साबून कोकणातील शेखाडीत उतरला पण त्याने फेस...

१२ मार्च १९९३ : काला साबून कोकणातील शेखाडीत उतरला पण त्याने फेस आणला, कारण…

१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटांना ३० वर्षे पूर्ण

Google News Follow

Related

वर्ष होतं १९९३. दिवस होता १२ मार्च. याच दिवशी मुंबई बारा बॉम्बस्फोटांनी हादरली. आज या दिवसाला ३० वर्षे पूर्ण होताहेत. परंतु आजही त्या जखमा मुंबईकर विसरलेला नाही आणि विसरूही शकत नाही. अजूनही त्या जखमा ताज्या आहेत. आजही हा दिवस म्हटला की प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहतो. कारण हा दिवस मुंबईकर काय तर संपूर्ण देशवासीय विसरणार नाहीत. हा दिवस सर्वांसाठी काळा दिवस ठरला.

या दिवशी एकेक करून असे १२ साखळी बॉम्बस्फोट झाले होते. पहिला बॉम्बस्फोट बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये दुपारी १.३० वाजता झाला. त्यानंतर एअर इंडिया बिल्डिंग, शिवसेना भवन, शेअर बाजार, सेंच्युरी बाजार, हॉटेल जुहू सेंटॉर, झवेरी बाजार, प्लाझा सिनेमा, पासपोर्ट ऑफिस, काथा बाजार, हॉटेल सी रॉक, मुंबई विमानतळ अशा १२ ठिकाणी स्फोट घडवण्यात आले. या साखळी बॉम्बस्फोटात २५७ जणांनी आपले प्राण गमावले, अनेक जखमी झाले. या हल्ल्यांचा मास्टरमाईंड असलेल्या दाऊद इब्राहीमला अद्यापही अटक झालेली नाही.

हेही वाचा :

६२ वर्षे झाली, आता ऑस्करविजेते रेड कार्पेटवरून चालणार नाहीत

तूर्त तरी ध्रुव हेलिकॉप्टरची घरघर थांबली.. जाणून घ्या कारण

रायगडावर जात आहात, पण रोपवे बंद आहे!

‘त्या’ जोडप्याचा भांग पिऊन बाथरुममध्ये झाला मृत्यू

मायानगरी मुंबई १९९३ मध्ये बॉम्बस्फोट मालिकेने हादरली होती. हा या महानगरावरील पहिला दहशतवादी हल्ला होता. या स्फोटांसाठी आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता. या आरडीएक्सचे धागेदोरे रायगड जिल्ह्यातील शेखाडी गावात असल्याचे तपासात उघड झाले. या बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेले आरडीएक्स रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन इथल्या शेखाडी गावाच्या समुद्र किनाऱ्यावर उतरवण्यात आले होते. त्यानंतर शेखाडीतून हे आरडीएक्स मुंबईत आणण्यात आले.   शेखाडी साधारण १२०० हून अधिक लोकसंख्या असलेले हे गाव. या गावातील मुस्लिम समाजामध्ये त्या घटनेच्या आठवणी आजही ताज्या आहेत. श्रीवर्धन आणि आसपासचा समुद्रकिनारा हा साधारण ५० किमी दूर आहे. शेखाडी या गावाचा समुद्र किनारा खडकाळ आहे. ओहोटीत हा भाग स्पष्ट दिसतोही. आरडीएक्स वाहून आणलेली बोट समुद्र किनाऱ्याला लावताना त्यावेळेस भरती असल्याने खलाशाला या खडकाचा अंदाज आला नसावा आणि ही बोट खडकात अडकल्याचे सांगितले जाते. त्यावेळेस हे आरडीएक्स समुद्र किनाऱ्यावर आणण्यासाठी ग्रामस्थांना ‘काला साबून आया है’  असे सांगण्यात आले. नेहमीपेक्षा जास्त पैसे देण्याचे आश्वासन दिल्यानंतर गावातील काहींनी हा माल किनाऱ्यावर आणण्यास मदत केली. गावकऱ्यांना आपण काय वाहतोय याचा सुगावाही नव्हता, असे स्थानिकांनी सांगितले.   स्फोटानंतर शेखाडी गावातील काही लोकांना त्यानंतर अटक करून ताब्यात घेण्यात आले होते. काही वाहने आणि बोटीही पोलिसांनी ताब्यात घेतल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा