29 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
घरविशेष२० हजार अतिरिक्त निमलष्करी दलाचे जवान मणिपूरमध्ये तैनात

२० हजार अतिरिक्त निमलष्करी दलाचे जवान मणिपूरमध्ये तैनात

याआधी ५० तुकड्या मणिपूरला पाठवण्यात आल्या आहेत

Google News Follow

Related

मणिपूरमधील हिंसाचाराची दखल केंद्र सरकारने घेतली असून मणिपूरमधील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शुक्रवारी निमलष्करी दलाच्या आणखी २० तुकड्या मणिपूरला पाठवल्या आहेत.

२० हजार अतिरिक्त निमलष्करी कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या २० तुकड्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर मणिपूरमध्ये पाठवण्यात आल्या. याआधी ५० तुकड्या मणिपूरला पाठवण्यात आल्या आहेत.

“आमची सुरक्षा आढावा बैठक झाली आणि या बैठकीत सर्व जिल्हे आणि इम्फाळ शहराच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान लष्कर, पोलीस, सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपीचे अधिकारी उपस्थित होते. ज्या काही अडचणी आल्या, आम्ही त्या सोडवल्या. आम्ही सर्व जिल्ह्यांच्या डीसी आणि एसपींसोबत समस्यांवर चर्चा केली आहे,” अशी माहिती मणिपूर सरकारचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंग यांनी दिली आहे.

दरम्यान, मणिपूरमध्ये हिंसक चकमकींच्या संख्येत वाढ होत असताना, गेल्या १० दिवसांत राज्यात ९० हजार अतिरिक्त निमलष्करी दलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या एकूण ९० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

नक्षलवादावर शून्य सहनशीलता; वर्षभरात २०७ नक्षलवाद्यांचा खात्मा

फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आम्ही सहर्ष स्वीकार करू!

विनोद तावडेंनी राहुल गांधी, खर्गेंना पाठविली १०० कोटींची नोटीस!

बूमराहच्या दणक्याने कांगारू कोलमडले

मणिपूरमध्ये अपहरण केलेल्या सहा जणांचे मृतदेह जिरीबाम जिल्ह्यात सापडले यानंतर मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार भडकला होता. निदर्शनांनंतर, हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये इम्फाळ पश्चिम आणि इम्फाळ पूर्वमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आणि सात जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा निलंबित करण्यात आली होती. रविवारी मणिपूरमध्ये निदर्शने आणि हिंसाचार वाढला, परिणामी सुरक्षा दलांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोळीबार केल्यानंतर जिरीबाम जिल्ह्यात एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. वाढत्या तणावादरम्यान, जमावाने त्या भागातील भाजपा आणि काँग्रेसच्या स्थानिक कार्यालयाची तोडफोड करत कार्यालये पेटवून दिली. अशातच केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशानुसार, राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मणिपूरमधील अलीकडील हिंसाचाराशी संबंधित तीन प्रकरणांची चौकशी हाती घेतली आहे.

गेल्या वर्षी ३ मे पासून ईशान्य राज्यातील इम्फाळ व्हॅली-आधारित मेइटिस आणि लगतच्या टेकड्या-आधारित कुकी-झो गटांमधील जातीय संघर्षात २०० हून अधिक लोक मारले गेले आहेत आणि हजारो बेघर झाले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
207,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा