31 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरविशेषकेरळमध्ये बोट उलटून २१ जणांचा मृत्यू, केंद्र सरकारकडून २ लाखांची मदत

केरळमध्ये बोट उलटून २१ जणांचा मृत्यू, केंद्र सरकारकडून २ लाखांची मदत

केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात प्रवाशांनी घेऊन जाणारी बोट नदीत उलटून मोठी दुर्घटना

Google News Follow

Related

केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात प्रवाशांनी घेऊन जाणारी बोट नदीत उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या बोटीत ४० लोक प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. बोटीतील अनेक लोक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी शोधकार्य सुरू आहे.

पुरपुझा नदीवरील थुवल थेराम पर्यटनस्थळावर सायंकाळी सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. स्थानिकांनी दिलेल्या महितीनुसार, बोटीमध्ये प्रमाणाच्या बाहेर लोकं चाढल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी बचाव पथकाशिवाय अनेक मच्छिमार आणि स्थानिक लोकही बचाव कार्यामध्ये सहभागी झाले आहेत. नदीतून काही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून जखमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघात झाला तेव्हा बोट किनाऱ्यापासून सुमारे ३०० मीटर दूर होती. मिळालेल्या माहितीनुसार, बोटीत बसलेले लोक मलप्पुरमच्या परप्पनगडी आणि तनूर भागातून आले होते. विशेष म्हणजे येथे प्रवासी बोटींना संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच चालवण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे ७ वाजता ही बोट प्रवाशांना घेऊन कशी गेली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन सकाळी दुर्घटनास्थळी भेट देणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे आज होणारे राज्यातील सर्व शासकीय विभागांचे अधिकृत कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

‘द केरळ स्टोरी’ हा अंतर्बाह्य हादरवून टाकणारा अनुभव

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे घामोळ्याच्या पावडरला फुटला घाम

मोचा चक्रीवादळाचा धोका, महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता

बजरंग दल करणार सामुहिक हनुमान चालीसा पठण

केरळमधील या घटनेवर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून २ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा