उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये गेल्या वर्षी घडलेल्या हिंसक घटनांनंतर प्रशासन आता सतर्क झाले आहे. शहराच्या सुरक्षेसाठी संवेदनशील भागांसह १२७ ठिकाणी ३०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. महापालिका कार्यकारी अधिकारी मणिभूषण तिवारी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, १५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून शहरात देखरेखीसाठी २ कोटी रुपयांचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी २४ नोव्हेंबर रोजी संभलच्या कोट गरवी भागात मुघलकालीन जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले.
सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि भविष्यातील कोणत्याही घटनांवर प्रभावीपणे लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ही योजना प्रस्तावित केली आहे, असे अधिकारी मणिभूषण तिवारी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, आधीच बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यात आणि त्यांची ओळख पटवण्यात मोठी मदत झाली आहे. त्यामुळे शहरातील १२७ ठिकाणी बसवण्यात येणाऱ्या नव्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे सुरक्षा आणि देखरेख मजबूत होईल आणि वाहतूक व्यवस्थापन, कायदा अंमलबजावणी आणि सार्वजनिक सुरक्षा वाढेल. विशेषतः महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि चोरी रोखण्यासाठी याचा फायदा होईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.
हे ही वाचा :
तेलंगणात शिवरायांच्या पुतळ्यावर प्लास्टिक टाकत अनावरण रोखले, पण वारा आला आणि…
‘महाकुंभ’ बद्दल वादग्रस्त बोलणाऱ्याचा मोदींनी घेतला समाचार
उत्तर प्रदेश: गुलनाज आणि सरफराजने स्वीकारला सनातन धर्म, ११ आणि ३ हजारांचा मिळाला धनादेश!
उन्नाव : तौहीद अलीने १९ वर्षीय मुलीची केली निर्घृण हत्या
हे कॅमेरे प्रमुख प्रवेश आणि संवेदनशील क्षेत्रे आणि प्रमुख चौकांमध्ये बसवले जातील. यासोबतच, ‘व्हॉइस कंट्रोलर’ सिस्टममध्ये एकत्रित केले जाईल. ते म्हणाले, “कॅमेऱ्यांचे नियंत्रण आणि देखरेख दोन केंद्रीकृत नियंत्रण कक्षांद्वारे केली जाईल. यातील एक कक्ष अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी) यांच्या देखरेखीखाली चालवला जाईल, तर दुसरा कक्ष पोलिस, महापालिका अधिकारी आणि देखभालीसाठी जबाबदार असलेल्या एजन्सीद्वारे संयुक्तपणे चालवला जाईल. ते पुढे म्हणाले की, योजना सुरू झाली आहे आणि पूर्ण अंमलबजावणीसाठी दोन ते तीन महिने लागतील अशी अपेक्षा आहे.