26 C
Mumbai
Tuesday, July 23, 2024
घरविशेषरशियात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या जळगावातील चौघांचा नदीत बुडून मृत्यू!

रशियात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या जळगावातील चौघांचा नदीत बुडून मृत्यू!

एका विद्यार्थिनीला वाचवण्यात यश, उपचार सुरु

Google News Follow

Related

रशियातील सेंट पीटर्सबर्गजवळील एका नदीत चार भारतीय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.तर एका विद्यार्थिनीला वाचवण्यात यश आले आहे.वाचवण्यात आलेल्या विद्यार्थिनीवर उपचारसुरू आहेत.मृत्यू झालेले हे विद्यार्थी जळगावातील असल्याची माहिती आहे.हे विद्यार्थी यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शाखेत शिकत होते.विद्यार्थ्यांच्या मृत्यूची सर्व माहिती जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रशिया येथील दुतावासातील कुमार गौरव ( आय.एफ.एस ) यांच्याशी संपर्क साधून घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे विद्यार्थी रशियाच्या यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होते.हे विद्यार्थी अभ्यासाच्या अभ्यासाच्या मोकळ्या वेळेत संध्याकाळी वोल्खोव्ह नदीच्या किनारी शहराच्या समुद्रकिनाऱ्याजवळ फेरफटका मारत होते. त्यावेळी लाट येऊन त्यांचा त्यात बुडून मृत्यू झाला.तर एका विद्यार्थिनीला वाचवण्यात यश आहे.त्या विद्यार्थिनीवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबत रशिया येथील दुतावासातील कुमार गौरव ( आय.एफ.एस ) यांच्याशी संपर्क करून सर्व माहिती घेतली.भारतीय दूतावासाने एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही मृतदेह लवकरात लवकर नातेवाईकांकडे पाठवण्याचे काम करत आहोत.” “ज्या विद्यार्थ्याचे प्राण वाचले, त्यांच्यावर योग्य उपचारही केले जात आहेत.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
166,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा