37 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
घरविशेषजेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदासाठी ४५ उमेदवार शर्यतीत

जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदासाठी ४५ उमेदवार शर्यतीत

२२ मार्चला होणार निवडणूक

Google News Follow

Related

नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ४५, उपाध्यक्षपदासाठी ४३, सचिवपदासाठी ४४, संयुक्त सचिवपदासाठी ३८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. कौन्सिलरपदासाठी २५८ उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शनिवारपर्यंतची मुदत आहे. याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल. यावेळी सर्व डाव्या संघटना मिळून निवडणुका लढवणार आहेत. डाव्यांच्या संयुक्त आघाडीतर्फे धनंजय किंवा मधुरिमा कुंडू अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. ही निवडणूक आइसा, एआयएसएफ, डीएसएफ आणि एफएसआय मिळून लढवणार आहेत. मात्र कोणत्या पदासाठी कोणत्या संघटनेचा उमेदवार निवडणूक लढवेल, हे शनिवार दुपारपर्यंत ठरणार आहे.
जेएनयूमध्ये एनएसयूआयशी आघाडी होऊ शकलेली नाही. जेएनयूमध्ये केंद्रीय समितीची केवळ चारच पदे आहेत. तर, आघाडीत विविध संघटना असल्यामुळे सर्वांना केंद्रीय समितीत जागा मिळू शकत नाही, त्यामुळे एनएसयूआयशी आघाडी होऊ शकली नसल्याचे सांगितले जात आहे.

२२ मार्चला ही निवडणूक होणार असून २४ मार्चला याचा निकाल जाहीर होईल. अभाविपचे जेएनयूचे मंत्री विकास पटेल यांनी आम्ही लवकरच जाहीरनामा काढू, असे आश्वासन दिले. करोनासाथीनंतर चार वर्षांनंतर जेएनयूमध्ये निवडणुका होत आहेत.

हेही वाचा :

‘भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यासाठी दबाव आणणार नाही’

‘माझ्या प्रिय कुटुंबातील सदस्य’ म्हणत नरेंद्र मोदींनी १४० कोटी भारतीयांना उद्देशून लिहिलं पत्र

प्रत्येक सर्वेक्षणात भाजपला आघाडी; विरोधी पक्षांना रणनिती बदलण्याची गरज?

१०० कोटींची लाच; १० पेक्षा अधिक मोबाइल बदलले

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यंदा अर्जुन आनंद, उमेशचंद्र अजमीरा, गोविंद डांगी, मंजुल पवार, काव्या पाल, मेधा सिंह, दीपिका शर्मा, उन्नती पंजीकर, एएस. स्टॅलिन, कनिष्क गौर, अभिषेक सिंह, आकाश कुमार रवानी निवडणूक रिंगणात आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा