30 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
घरविशेषअहमदनगरमध्ये ७०० रुग्ण मृत्युच्या दाढेत

अहमदनगरमध्ये ७०० रुग्ण मृत्युच्या दाढेत

Google News Follow

Related

समाजसेवी संस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

ऑक्सिजनचा पुरवठा नाही, रेमडेसिवीर इंजेक्शन्स मिळत नाहीत, अशा अत्यंत बिकट परिस्थितीत अहमदनगरमधील जवळपास १२ खासगी आणि सरकारी रुग्णांलयात दाखल असलेले ७०० रुग्ण मृत्युच्या दाढेत सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात हाहा:कार उडाला आहे. विविध सामाजिक संघटनांनी मिळून या दुरवस्थेविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी धडक मोर्चा काढला.

हे ही वाचा:

फडणवीसांचा एक फोन आणि महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस

तृणमुलच्या नेत्याचा धमकावतानाचा व्हिडिओ प्रसिद्ध

युजीसी, एनइटीची परीक्षाही लांबणीवर

अमेरिकेत सोळा वर्षांवरील सर्वांना लस मिळणार

यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते ऍड. श्याम असावा यांनी सांगितले की, अहमदनगर जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळपर्यंतच पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा आहे. खासगी आणि सरकारी वितरकांकडून ऑक्सिजनचा पुरवठाच झालेला नाही. त्यामुळे हे रुग्ण मृत्यूच्या दारात लोटले गेले आहेत. संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच हा उरलेला साठा वापरता येईल. गेले ८ दिवस रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा व्यवस्थित पुरवठाच नाही. आमचा त्यासाठी संघर्ष सुरू आहे. या इंजेक्शन्सचा प्रचंड काळाबाजार सुरू आहे. इंजेक्शन्स आली तरी ती रुग्णांना मिळत नाहीत. आजही आम्हाला चार इंजेक्शन्स तातडीने हवी होती, पण ती मिळालेली नाहीत. या स्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संस्थांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला आहे. आमच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत तोपर्यंत इथे आम्ही बेमुदत आंदोलन करणार आहोत. नगर जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांचा महासंघ याविरोधात आंदोलन करत आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या कार्यालयाबाहेर आम्ही धरणे धरले आहे. या संदर्भात डॉ.गिरीश कुलकर्णी म्हणाले की, आम्ही याआधीही त्यांच्या कार्यालयाबाहेर रेमडेसिवीर इंजेक्शनसंदर्भात आंदोलन केले होते. पुढील तीन दिवसांत व्यवस्था होईल, असे आम्हाला सांगण्यात आले होते. पण अजूनही इंजेक्शन्स उपलब्ध नाहीत. नगर मधील विविध सामाजिक संस्था,संघटना,रुग्णांचे नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकत आहेत. या आंदोलनात अजित कुलकर्णी, राहुल खिरोडे, किशोर मुनोत, प्रियांका सोनवणे, सीमा गंगावणे सहभागी आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा