33 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
घरविशेषमुंबईमधील स्विमिंग पूलमध्ये शिरली मगर

मुंबईमधील स्विमिंग पूलमध्ये शिरली मगर

शिवाजी पार्कमधल्या महात्मा गांधी स्विमिंग पूलमधील घटना

Google News Follow

Related

मुंबईतील एका स्विमिंग पूलमध्ये मगर अढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दादर मधील शिवाजी पार्क येथील महात्मा गांधी जलतरण तलावात ही मगर आढळल्याने खळबळ उडाली होती.

मुंबईच्या शिवाजी पार्कमधल्या महात्मा गांधी स्विमिंग पूलमध्ये मंगळवार, ३ ऑक्टोबर रोजी सकाळी एक मगरीचे पिल्लू आढळले. हे पिल्लू दिसताच सर्व कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली होती. एका कर्मचाऱ्याने मगरीला पकडून ड्रममध्ये ठेवलं. यादरम्यान मगरीने एका कर्मचाऱ्याला चावा देखील घेतला.

मुंबईसारख्या शहरात स्विमिंग पूलमध्ये मगर सापडल्याने खळबळ उडाली. तर, महात्मा गांधी जलतरण तलावाच्या बाजूलाच एक प्राणी संग्रहालय आहे. त्यामधून सुटून बाहेर पडलेली ही मगर असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याआधी देखील अजगर आणि साप याच प्राणीसंग्रहालयातून सुटून बाहेर पडल्याने लोकांमध्ये घबराट पसरली होती.

जलतरण तलावाच्या बाजूलाच एक प्राणी संग्रहालय असून ते अनधिकृत आहे. त्यातून हे प्राणी बाहेर येतात. यापूर्वी अजगर, साप असेच बाहेर पडले होते. हे प्राणी कोणाला चावले तर कोणाची जबाबदारी? मुळात असे प्राणी पाळायला परवानगी कोणी दिली? कोणाचा राजकीय वरदहस्त या प्राणी संग्रहालयात आहे? ती जागा पालिकेने न्यायालयात जिंकली आहे, तरी कारवाई होत नाही, असे मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले.

हे ही वाचा:

नांदेड मधील रुग्णांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई होईल!

बांगलादेशात नऊ महिन्यात डेंग्यूने घेतेले १ हजारहून अधिक बळी

ऍमेझॉनमध्ये पाण्याचे तापमान वाढले; १००हून अधिक डॉल्फिनचा मृत्यू

अभिनेता विवेक ऑबेरॉयची केली दीड कोटींची फसवणूक; एकाला अटक

जलतरण तलाव व नाट्यगृहांचे समन्वयक संदीप वैशंपायन यांनी सांगितले की, “रोज पहाटे तरण तलाव सदस्यांसाठी सुरू करण्यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांद्वारे तलावाचे काळजीपूर्वक निरीक्षण करण्यात येते. त्यानुसार पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास तलावाचे निरीक्षण करत असताना ऑलम्पिक आकाराच्या आणि शर्यतीसाठीच्या तरण-तलावात मगरीचे पिल्लू आढळून आले. त्यानंतर तज्ञांच्या मदतीने तात्काळ कार्यवाही करीत हे पिल्लू सुरक्षितपणे पकडण्यात आले. हे पिल्लू वनखात्याच्या ताब्यात देण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
152,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा