27 C
Mumbai
Sunday, September 15, 2024
घरविशेषधक्कादायक ! कार चालवताना चालकाला हृदयविकाराचा झटका, दोघांचा मृत्यू !

धक्कादायक ! कार चालवताना चालकाला हृदयविकाराचा झटका, दोघांचा मृत्यू !

दुर्घटनेत दोघे गंभीर जखमी

Google News Follow

Related

नंदुरबारमधून अपघाताची धक्कादायक बातमी समोर आली आहे. कार चालवत असताना कार चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने चौघांना चिरडले. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ह्रदयविकार आलेल्या कार चालकाचाही मृत्यू झाला आहे.

गुजरात मधील ही कार असून GJ२६AE५७८६ हा त्याचा नंबर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबारच्या मिरज सिनेमाजवळ कोकणी हिल परिसरात हा अपघात झाला. वाहन चालकाला वाहन चालवत असताना गाडीतच चालकाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा कारमध्येच मृत्यू झाला. तारीख खान असे कार चालकाचे नाव आहे.

हे ही वाचा :

नाशिक ते कानपूर; जिहादचा ताजा अंक

राहुल गांधींना ‘पहिल्या रांगेत’ बसवण्यासाठी लागल्या रांगा!

मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंचा राऊतांना पाठींबा असेल का?

ममता बॅनर्जी आंदोलन काय करता, राजीनामा द्या !पीडितेच्या आईची मागणी

 

चालकाचा मृत्यू झाल्याने कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने रस्त्यावरील चौघांना उडवले. या धडकेत सायकलने जाणाऱ्या एका ६० वर्षीय भंगार विक्रेत्याचा मृत्यू झाला तर रस्त्याने पायी जाणाऱ्या आई आणि मुलगा यामध्ये गंभीर जखमी झाले. रज्जाक खान असे सायकल स्वाराचे नाव असून त्याचा जागीच मृत्यू झाला. जखमी झालेल्या दोघांना नंदुरबारच्या नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मनिषा पवार आणि १२ वर्षीय गोलू पवार असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा