32 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
घरविशेषबॉलीवूडला पडली वीर सावरकरांची भुरळ, लवकरच येणार बायोपिक

बॉलीवूडला पडली वीर सावरकरांची भुरळ, लवकरच येणार बायोपिक

Google News Follow

Related

बॉलीवुड अर्थात हिंदी चित्रपट सृष्टीत सध्या बायोपिकचा म्हणजेच जीवनपटांचा काळ सुरू आहे. विविध क्षेत्रातील ऐतिहासिक तसेच प्रसिद्ध व्यक्तींवर हे जीवनपट साकारले जात असतात. त्यातच आता बॉलिवूडला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची भुरळ पडली असून सावरकरांवर बायोपिक साकारला जाणार आहे. शुक्रवार २८ मे अर्थात सावरकरांच्या १३८ व्या जयंतीदिनी यासंबंधीची घोषणा करण्यात आली आहे.

बालपणापासूनच भारतमातेच्या स्वातंत्र्याच्या ध्येयाने झपाटून त्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनप्रवास हा कायम प्रेरणादायी राहिला आहे. सावरकरांचा हा जीवनप्रवास आता रुपेरी पडद्यावर उलगडला जाणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्यावरील चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. बॉलिवूड निर्माते संदीप सिंह हे चित्रपट साकारत असून या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक मराठमोळे महेश मांजरेकर करणार आहेत. तर स्वतः महेश मांजरेकर यांनीच रिशी विरमानी यांच्यासोबत या चित्रपटाचे लेखन सुद्धा केले आहे.

हे ही वाचा:

सावरकर आणि ज्यू नि इस्राएल

आम आदमी पक्षाकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान

स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी केले अभिवादन

महिना लोटला, पालिकेच्या स्वप्नातील ऑक्सिजन प्रकल्प गेले कुठे?

संदीप सिंग यांनी इंस्टाग्राम वर या चित्रपटाच्या पोस्टरची झलक प्रसिद्ध केली आहे. यावेळी ‘स्वातंत्र्याचा इतिहासाची पूर्ण गोष्ट अजून जाणून घेणे बाकी आहे लवकरच भेटू स्वातंत्र्यवीर सावरकरांना’ असे संदीप सिंग यांनी यावेळी म्हटले आहे. देशात वीर सावरकरांचे समर्थन आणि टीका ही समप्रमाणात होते पण लोकांना त्यांच्याबद्दल फार माहीत नसल्यामुळे हे होत असल्याचे संदीप यांनी म्हटले आहे. ते आपल्या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते हे कोणीच नाकारू शकत नाही. त्यांचे आयुष्य आणि प्रवास लोकांसमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे असे सिंग यांनी म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sandeep Singh (@officialsandipssingh)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा