30 C
Mumbai
Thursday, March 12, 2026
घरविशेषअजित पवार यांचे भव्य स्मारक उभारणार

अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अर्थसंकल्प सादर करताना घोषणा

Google News Follow

Related

महाराष्ट्र राज्याचा २०२६- २७ चा अर्थसंकल्प शुक्रवार, ६ मार्च रोजी विधानसभेत मांडण्यात आला. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अर्थसकंल्पाला राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री आणि माजी अर्थमंत्री अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावनिक होत अजित पवार यांचे राज्याच्या अर्थकारणातील योगदान अधोरेखित केले. अजितदादा आज आपल्यात नाहीत, पण त्यांचे आणि अर्थसंकल्पाचे नाते अतिशय दृढ होते. त्यांनी विक्रमी ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला. कामाचा माणूस हीच त्यांची खरी ओळख होती. माझं अंतःकरण जड झालं आहे. त्यांच्या करड्या स्वभावामुळे प्रशासनात शिस्त आणि कार्यक्षमतेची परंपरा कायम राहिली. हा अर्थसंकल्प मी त्यांना समर्पित करतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा:

कर्नाटकमध्ये १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियाच्या वापरावर बंदी

श्रीलंकेने इराणच्या ‘IRINS बुशेहर’ला दिला आश्रय

“आधी लक्ष्य इराण, नंतर क्युबा!”

भारतीय चहाच्या निर्यातीवर मोठा परिणाम

अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. अजित पवारांच्या व्यक्तिमत्त्वाला आणि त्यांच्या कर्तृत्वाला साजेसे एक भव्य स्मारक राज्य सरकारतर्फे उभारण्यात येणार आहे. तसेच प्रशासकीय कामात आणि नागरी सोयीसुविधांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांसाठी ‘अजित पवार गतिमान नागरी सन्मान’ हा पुरस्कार सुरू करण्यात येणार आहे. त्यांच्या गतिमान कार्यपद्धतीचा वारसा पुढे नेण्यासाठी हा नवीन पुरस्कार दिला जाणार आहे. या घोषणेनंतर उपस्थित सदस्यांनी सभागृहाने बाके वाजवून या निर्णयाचे स्वागत केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
297,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा