27 C
Mumbai
Monday, November 21, 2022
घरविशेषतब्बल ४११ दिवसांनी कोरोनाग्रस्त झाला बरा!

तब्बल ४११ दिवसांनी कोरोनाग्रस्त झाला बरा!

The man had positive results until January 2022 and has been cured successfully after 411 days.

Google News Follow

Related

ब्रिटीश संशोधकांनी अखेरीस कोविड-19 विषाणूने संसर्गित व्यक्तीला बरे केले आहे. टीमने विषाणू प्रकाराच्या अनुवांशिक कोडचे विश्लेषण केले आणि त्यावर उपचार कसे करावे हे शोधून काढले.

हे ही वाचा:

नितेश राणेंचा मोर्चा आणि त्याच रात्री लागला मुलीचा शोध

संभाजी भिडेंनी पत्रकाराला सांगितले, आधी टिकली लाव मगचं बोलू

मुंबईत एका मुलीचे फुटपाथवरून अपहरण, दोन महिला अटकेत

५९ वर्षीय व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती डिसेंबरमध्ये झालेल्या किडनी प्रत्यारोपण मुळे कमी झाली. तेव्हापासून, यावर्षी जानेवारीपर्यंत त्यांची चाचणी पॉझिटिव्ह येत होती. लक्षणे कमी होत असूनही, तो जानेवारी २०२२ पर्यंत व्हायरसच्या नवीन प्रकारांसाठी टेस्ट करत होता. परंतु काही कारणाने सतत त्याचा टेस्टचा निकाल पॉझिटिव्ह येत होता. त्या माणसाला अनेक वेळा कोविडची लागण झाली होती किंवा तो एका सारख्या लक्षणांनी तो त्रस्त झाला होता . ह्याचे कारण समजून घेण्यासाठी संशोधकांनी त्याच्या रॅपिड जेनेटिकस साठी नॅनोपोर सिक्वेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर केला.चाचणीला २४ तासांपेक्षा कमी वेळ लागला आणि च्या उत्तरार्धात त्या माणसाला बी.१ चे रूपांतर झाल्याचे कळले . २०२० पासून, विषाणूचे उत्परिवर्तन झाले आणि त्याबरोबरच नवीन स्ट्रेन आल्याचे समजले. “रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्या ह्या रुग्णांचे काही महिने किंवा वर्षभरही टेस्ट पॉसिटीव्ह येऊ शकतात” , असे संसर्गजन्य रोगांचे तज्ञ डॉक्टर ल्यूक स्नेल म्हणाले.ओमिक्रॉन सारख्या नवीन प्रकारांविरूद्ध प्रारंभिक उपचार कुचकामी आहे. परंतु ह्या माणसाला आधीच्या टप्प्यातील विषाणूची लागण झाली असल्याने, ते त्याच्यासाठी योग्य ठरले

असे मानले जाते की कोविड विषाणूसोबत ४११ दिवसांएवढी मोठी लढाई ह्या माणसाने केली. असं जगात कुठेही झालेले नाही.एप्रिलमध्ये झालेल्या ECCMID परिषदेत असे सांगण्यात आले होते की, कोरोना पॉझिटिव्ह ठरलेल्या एका माणसाला ५०५ दिवस ही बाधा होती, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता. पण आता ४११ दिवस कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या माणसाला बरे करण्यात यश आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,955चाहतेआवड दर्शवा
1,977अनुयायीअनुकरण करा
51,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा