27 C
Mumbai
Tuesday, December 9, 2025
घरविशेष२६३ चे लक्ष्य गाठून पंजाबचा नवीन विक्रम

२६३ चे लक्ष्य गाठून पंजाबचा नवीन विक्रम

कोलकात्यावर केली मात

Google News Follow

Related

कोलकाताने ठेवलेले २६२ धावांचे लक्ष्य पंजाबने गाठून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. कोलकात्याच्या ईडन गार्डनवर शुक्रवारची रात्र कोलकात्याच्या गोलंदाजांसाठी काळरात्र ठरली. जॉनी बेअरस्टो याच्या झंझावाती शतकापुढे कोलकात्याच्या गोलंदाजांचा पालापाचोळा झाला. टी२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणारा संघ म्हणून पंजाबचे नाव कोरले गेले. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वेस्ट इंडिजविरोधात चार बाद २५९ धावांचे लक्ष्य यशस्वीरीत्या पार केले होते.

जॉनी बेअरस्टो याने ४८ चेंडूंत नाबाद १०८ धावा केल्या. तर, शशांक सिंह याने २८ चेंडूंत नाबाद २८ धावा करून हा सामना १८.३ षटकांतच खिशात टाकला. बेअरस्टो आणि शशांक या जोडगोळीने अवघ्या ३७ चेंडूंत ८४ धावा केल्या.
या सामन्यात ४२ षटकार लगावले गेले. हादेखील टी२०चा एक विक्रम म्हणून नोंदला गेला. सध्याच्या आयपीएल हंगामात ५००पेक्षा अधिक धावसंख्या उभारण्याची ही तिसरी वेळ ठरली. आतापर्यंत टी २० क्रिकेटच्या इतिहासात केवळ सातवेळा दोन्ही संघांनी ५००पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्यातील तीन या यंदाच्या आयपीएल हंगामातील आहेत.

तसेच, आयपीएलच्या इतिहासात सर्व चार सलामीवीरांनी ५०पेक्षा अधिक धावा केल्याचेही प्रथमच घडले. कोलकात्यानेही त्यांची सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाची धावसंख्या उभारली. जॉनी बेअरस्टो याने सलामीवीर प्रभसिमरन सिंग याच्यासोबत ९३ धावांची भागीदारी केली. त्यांनी अवघ्या सहा षटकांत ही कामगिरी केली. प्रभसिमरन सिंग याने २० चेंडूंत पाच षटकार आणि चार चौकार लगावून ५४ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या रिली रुसोलू याने १६ चेंडूंत २६ धावा केल्या. पंजाबच्या चारपैकी तीन फलंदाजांचा स्ट्राइक रेट २०० होता तर, रुसोचा १६२.५०.

हे ही वाचा:

‘अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा न देऊन स्वार्थाला प्राधान्य दिले’

मतदाना ऐवजी तरुणाने घातला ईव्हीएम मशीनवर कुऱ्हाडीचा घाव!

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सरासरी ६४.२१% मतदान!

इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचा आंबा निर्यातीला फटका

सुनील नारायणने चार षटकांत केवळ २४ धावा केल्या. तर, अँड्रे रसेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येक षटकात १३हून अधिक धावा दिल्या. फिल सॉल्टने ३७ चेंडूंत ७५ धावा केल्या. व्यंकटेश अय्यर याने २३ चेंडूंत ३९ आणि फॉर्मात नसणाऱ्या श्रेयस अय्यर याने अवघ्या १० चेंडूंत २८ धावा केल्या. तर, अँड्रे रसेलने १२ चेंडूंत २४ धावा केल्या. पंजाबकडून केवळ राहुल चहर याने प्रति षटक १०पेक्षा कमी धावा दिल्या. या लेगस्पिनरने चार षटकांत एक बाद ३३ धावा केल्या. तर, कागिसो राबाडा महागडा ठरला. त्याच्या तीन षटकांत ५२ धावा कुटल्या गेल्या.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा