‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेनिमित्त भारतीय सेनेच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रा काढण्यात आली. मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये ‘जन सहयोग जन कल्याण बहुउद्देशीय समिती’च्यावतीने ही यात्रा पार पडली. त्याच वेळी पंजाबच्या पठाणकोटमध्ये महिलांनी ‘ऑपरेशन सिंदूर शौर्य यात्रा’ काढली. ग्वाल्हेरमध्ये स्टेट बँक चौक तानसेन रोडपासून हाजिरा चौकापर्यंत ही तिरंगा यात्रा काढण्यात आली. या यात्रेत सुमारे २०० लोक सहभागी झाले होते, ज्यात महिला, पुरुष आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. ९० मीटर लांब तिरंगा झेंडा घेऊन ‘भारतीय सेना जिंदाबाद’, ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’ अशा देशभक्तीपूर्ण घोषणा देत सर्वजण निघाले होते. हाजिरा चौकात यात्रेच्या समारोपावेळी, पहलगाममध्ये शहीद झालेल्या २६ नागरिकांसाठी दोन मिनिटांचं मौन पाळण्यात आलं.
समितीचे अध्यक्ष उमेश सिंह म्हणाले, “जेव्हा जेव्हा भारतावर संकट आलं, तेव्हा भारतीय सेनेने आपल्या प्राणांची पर्वा न करता देशाच्या स्वाभिमानाचं रक्षण केलं. यात्रेमध्ये महिला अध्यक्ष शशि सिंह यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. पठाणकोटमध्ये महिलांनी ‘ऑपरेशन सिंदूर शौर्य यात्रा’चे आयोजन केलं. या यात्रेत महिलांबरोबरच शालेय विद्यार्थी, एनसीसी कॅडेट्स मोठ्या संख्येने सहभागी झाले.
हेही वाचा..
‘मन की बात’मधील विचार वाराणसीकरांना प्रेरणादायक वाटला
संयुक्त राष्ट्रीय गिर्यारोहण पथकाने माउंट एव्हरेस्ट सर केलं
भारत बनला चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था
‘भारत माता की जय, भारतीय सेना जिंदाबाद, नारी शक्ति जिंदाबाद’ अशा घोषणांनी आसमंत दुमदुमला. ही यात्रा चिल्ड्रन पार्कपासून सुरू होऊन विविध बाजारपेठांमधून फेरफटका मारून पुन्हा परतली. सेनेच्या महिला कॅप्टन रुचा यांचा या यात्रेत विशेष सहभाग होता. त्यांनी महिलांना संबोधित करताना ऑपरेशन सिंदूरदरम्यान सेनेच्या पाठीशी उभं राहिल्याबद्दल आभार मानले. मंचावर उपस्थित महिलांनी सांगितलं की, “भारतविरोधी शक्तींशी लढण्यासाठी आपले संस्कार जपणं आवश्यक आहे, आणि देशातील वाईट प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी एकजूट होणं गरजेचं आहे.
