27.9 C
Mumbai
Sunday, July 19, 2026
घरविशेषआमीर खान म्हणतो की, फुनसुक वांगडू हे पात्र वांगचुक यांच्यावर आधारित नाही!

आमीर खान म्हणतो की, फुनसुक वांगडू हे पात्र वांगचुक यांच्यावर आधारित नाही!

मुलाखतीदरम्यान केले वक्तव्य, संभ्रम दूर करण्याचा केला प्रयत्न

Google News Follow

Related

सध्या नीट पेपरफुटीप्रकरणी सोनम वांगचुक हे दिल्लीत आंदोलनाला बसलेले असताना त्यांचा संबंध थ्री इडियट्समधील फुनसुक वांगडू या पात्राशी जोडला जात आहे. पण वांगचुक यांच्याशी वांगडू या पात्राचा कोणताही संबंध नाही, असे थ्री इडियट्समधील प्रमुख कलाकार आमिर खानने म्हटले आहे.

एका मुलाखतीत बोलताना अभिनेता आमिर खान याने शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या बेमुदत उपोषणाबाबत अखेर मौन सोडले आहे. अभिनेता आमिरने दीर्घकाळापासून असलेल्या त्या समजुतीवरही भाष्य केले की, ‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील त्याचे रँचो हे पात्र सोनम वांगचुक यांच्या जीवनावर आधारित असल्याचे म्हटले जात होते. मात्र, आमिर यांनी स्पष्ट केले की, हे सत्य नाही. तथापि, त्यांनी सांगितले की त्यांना सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची खूप चिंता आहे आणि त्यांनी लवकरच आपले उपोषण मागे घ्यावे, अशी आशा व्यक्त केली. सोनम वांगचुक २८ जूनपासून बेमुदत उपोषणावर आहेत.

आमिर खान यांनी व्यक्त केली भूमिका

गुरुवारी आमिर खान यांनी लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘लगान’ चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनासाठी उपस्थित राहून महोत्सवाचा समारोप केला. प्रदर्शना नंतर झालेल्या संवाद सत्रात त्यांनी २५ वर्षांनंतर ‘लगान’च्या वारशाबद्दल चर्चा केली आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. या संवादादरम्यान आमिर यांना सोनम वांगचुक, ज्यांच्या जीवनावरून ‘थ्री इडियट्स’ मधील रँचो हे पात्र प्रेरित असल्याचे मोठ्या प्रमाणावर मानले जाते, याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्याचबरोबर दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या बेमुदत उपोषणाबाबतही त्यांचे मत विचारण्यात आले.

या प्रश्नावर आमिर खान म्हणाला की, “नाही, हे खरं नाही. हा एक गैरसमज आहे. आम्ही ‘थ्री इडियट्स’ चित्रपट करत होतो, त्या वेळी मला  सोनम यांच्याबद्दल माहिती नव्हती. नुकताच मी चतुरचा (ओमी वैद्य) एक व्हिडिओ पाहिला आणि त्याने असे म्हटले. पण तो चुकीचा आहे. कदाचित चतुरला तसे वाटत असेल. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की, ना राजू (राजकुमार हिरानी), ना अभिजात (अभिजात जोशी) – जे या चित्रपटाचे दोन लेखक आहेत – आम्हा कोणालाही त्या वेळी सोनम यांच्याबद्दल माहिती नव्हती. मात्र, सोनम जे काम करत आहेत ते अत्यंत चांगले आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी त्यांना ‘थ्री इडियट्स’मधील पात्रावर आधारित असण्याची गरज नाही. वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी मला हे सांगायचे होते.”

हे ही वाचा:

मुंबई लोकलमध्ये ‘सीट वॉर’चा कळस; महिला डब्यात पेपर स्प्रे फवारला

‘मेहनत, जिद्द, संस्कारांच्या बळावरच गाठता येते यशाचे शिखर’

रोहित शर्मा खरंच निवृत्त होणार? प्रशिक्षकांचे वक्तव्य चर्चेत

अमेरिकेत जग्गू भगवानपुरिया टोळीचा सदस्य नितीश कौशल अटकेत

यानंतर आमिर यांना सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत वाढत चाललेल्या चिंतेविषयी विचारण्यात आले. दिल्लीतील जंतर-मंतर येथे ते अद्याप बेमुदत उपोषण करत आहेत.

यावर आमिर म्हणाला, “आम्हा सर्वांना त्यांच्या प्रकृतीची आणि त्यांच्या जीवाची खूप चिंता आहे. हे सर्व चांगल्या प्रकारे संपावे, अशी आमची इच्छा आहे. आम्ही सर्वजण आशा करतो की त्यांनी आपले उपोषण संपवावे.”

ओमी वैद्य यांनीही दिला पाठिंबा

यापूर्वी या आठवड्यात ‘थ्री इडियट्स’**मध्ये चतुर रामलिंगमची भूमिका साकारणारे अभिनेता ओमी वैद्य यांनीही सोनम वांगचुक यांना पाठिंबा दर्शवला होता.

सामाजिक माध्यमांवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ओमी यांनी सांगितले की, आमिर खान यांचे फुन्सुख वांगडू हे पात्र सोनम वांगचुक यांच्या जीवनावर आधारित होते आणि लोकांनी त्यांच्या खालावत चाललेल्या प्रकृतीकडे तसेच ते ज्या कारणासाठी लढत आहेत त्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले.

ओमी वैद्य म्हणाला होता की, “तुम्हाला माहिती आहे का, ‘थ्री इडियट्स’मधील फुन्सुक वांगडू हे पात्र प्रत्यक्षात लडाखमधील अभियंता, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसुधारक सोनम वांगचुक यांच्या जीवनावर आधारित आहे? मी त्यांना भेटलो आहे. ते खूपच रोचक व्यक्तिमत्त्व आहेत. सध्या ते खूप दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी खूपच खाली आली आहे. कदाचित तुम्ही याबद्दल ऐकले असेल. माध्यमांमध्ये याबद्दल बातम्या येत आहेत की नाही, मला माहिती नाही. पण हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.”

तो पुढे म्हणाला की, “मला फुन्सुक वांगडू मरावा असे वाटत नाही आणि मला वाटते तुम्हालाही तसे वाटत नसेल.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
321,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा