28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेषमध्य प्रदेशमध्ये वऱ्हाडाचा ट्रॅक्टर उलटून अपघात; १३ जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशमध्ये वऱ्हाडाचा ट्रॅक्टर उलटून अपघात; १३ जणांचा मृत्यू

अपघातात १५ हून अधिक जण जखमी

Google News Follow

Related

मध्य प्रदेशातील राजगडमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. लग्नासाठी वऱ्हाड्यांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटलण्याने हा भीषण अपघात झाला आहे. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये लहान मुलांसह, महिला आणि पुरूषांचा समावेश आहे.

रविवारी रात्री आठच्या सुमारास राजगड येथील पिपलोडी येथे लग्नाच्या वराती दरम्यान हा अपघात झाला. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, राजस्थानमधील मोतीपुरा येथून वरात कुलमपूरकडे जात होती. राजस्थानच्या सीमेला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील राजगडमध्ये हा अपघात झाला. या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार मुलांचाही समावेश आहे, तर या घटनेत १५ जण जखमी झाले आहेत.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सोशल मीडिया एक्सवरती पोस्ट करत म्हटलं की, राजगडचे जिल्हाधिकारी हर्ष दीक्षित, पोलिस अधीक्षक आणि मंत्री नारायण सिंह पनवार घटनास्थळी उपस्थित आहेत. आम्ही राजस्थान सरकार आणि पोलिसांच्या संपर्कात आहोत. जखमींना राजगड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही गंभीर जखमींना उपचारासाठी भोपाळला नेण्यात आले आहे.

हे ही वाचा:

अजबच! उष्म्यामुळे चोर एसी लावून झोपला, पकडला गेला!

रविना टंडनला लोकांनी घेरले, तिच्या वाहनचालकाने धडक दिल्यामुळे झाला राडा!

नकली यूट्यूब पत्रकार रोज मोदी सरकारच्या नावाने खडे फोडतात

तृणमूल काँग्रेसच्या गुंडांकडून भाजप कार्यकर्त्याचा खून

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आणि सोशल मिडीया पोस्ट करत म्हटलं की, मध्य प्रदेशातील राजगढ येथे रस्ते अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. या घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींच्या लवकरात लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा