27 C
Mumbai
Thursday, June 20, 2024
घरअर्थजगतमोदी ३.O चे परिणाम शेअर बाजारात; सेन्सेक्स २६२१ वर उघडला

मोदी ३.O चे परिणाम शेअर बाजारात; सेन्सेक्स २६२१ वर उघडला

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जबरदस्त तेजी

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडले असून आता निकालाची उत्सुकता आहे. एक्झिट पोलही जाहीर झाला असून आता ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. अशातच शेअर बाजारात मात्र, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर आलेला असून याच निकालाचा परिणाम सध्या शेअर बाजारावर दिसून येत आहे. देशात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना त्याचाच परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसतोय.

शेअर बाजारात, बीएसई सेन्सेक्स आज २००० अंकांच्या वर २६२१ वर उघडला. निफ्टी आज ८०७ अंकांच्या वर उघडला. एक्झिट पोलच्या निकालाचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. सेन्सेक्स सध्या ७६,०४४.८२ च्या पातळीवर धावत आहे. सकाळी ९ वाजता प्री-ओपनमध्ये निफ्टीमध्ये सुमारे एक हजार अंकांची आणि सेन्सेक्समध्ये २६०० हून अधिक अंकांची वाढ दिसून आली. अशा स्थितीत बाजारात बंपर वाढ होण्याची शक्यता होती.

लोकसभा निवडणुकीमुळे गेल्या काही दिवसांपासून मोठी अस्थिरता आहे. गुंतवणूकदार खबरदारी घेऊनच पैसे गुंतवत असून १ जून रोजी एक्झिट पोलचे आकडे आले. या आकड्यांत पुन्हा एकदा मोदी सरकार येण्याची शक्यता व्यक्त करण्यात झाली आहे. त्याच कारणामुळे सध्या शेअर बाजारात निफ्टी, सेन्सेक्स सकारात्मक दिसत आहेत. देशात पुन्हा एकदा स्थिर सरकार येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसत आहे.

हे ही वाचा:

राहुल गांधी म्हणतात एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे

अजबच! उष्म्यामुळे चोर एसी लावून झोपला, पकडला गेला!

रविना टंडनला लोकांनी घेरले, तिच्या वाहनचालकाने धडक दिल्यामुळे झाला राडा!

नकली यूट्यूब पत्रकार रोज मोदी सरकारच्या नावाने खडे फोडतात

४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर शेअर बाजारात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. मोदींचे सरकार पुन्हा आल्यास शेअर बाजार उसळण्याची शक्यता आहे. तर देशात सत्तांतर झाल्यास हाच निर्देशांक गडगडू शकतो, अशी शक्यता आहे. गेल्या आठवड्यात शेअर बाजारात घसरण झाली होती. अस्थिर व्यवहारादरम्यान बँका आणि पेट्रोलियम कंपन्यांच्या समभागांच्या खरेदीमुळे सेन्सेक्स ७५ अंकांच्या किंचित वाढीसह बंद झाला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
161,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा