राजा रघुवंशी हत्याकांडानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात असून आरोपींवर कडक कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. याच दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला मारहाण झाल्याचे समोर आले आहे. मारहाणीचा व्हिडीओ देखील सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. काल (१० जून) रात्री हत्या प्रकरणातील चार आरोपींना घेऊन मेघालय पोलिस इंदूर विमानतळावर प्रवेश करत असताना ही घटना घडली. यावेळी विमानतळावर सामान घेऊन उभ्या असलेल्या एका प्रवाशाने आरोपीला तेथून जाताना पाहिले तेव्हा त्याने अचानक एका आरोपीला थप्पड मारली. राजा रघुवंशीच्या हत्येवरुन संताप व्यक्त करत त्याने ही कृत्य केल्याचे सांगितले.
चारही आरोपींना मास्क घालून विमानतळावर नेले जात असल्याने, प्रवाशाने कोणाला थप्पड मारली हे लगेच कळू शकले नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. थप्पड मारल्यानंतर, त्या माणसाने म्हटले की, या घटनेमुळे माझ्या मनात राग होता म्हणून मी आरोपीच्या कानशिलात लगावली, आरोपींना फाशी दिली पाहिजे. प्रवासी सुशील लखवानी पुढे म्हणाला, “आमच्या इंदूरच्या मुलाची हत्या झाली आहे याचा मला राग आहे. त्या मुलीने पूर्ण नियोजनाने त्याची हत्या केली आहे. आरोपीला फाशी देण्यात यावी.”
इंदूरचे अतिरिक्त डीसीपी राजेश दंडोटिया यांनी सांगितले की, मेघालय पोलिसांचे १२ सदस्यांचे पथक राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील चार आरोपींना ट्रान्झिट कोठडीत घेऊन शिलाँगला रवाना झाले आहे. राज कुशवाह, विशाल चौहान, आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी अशी आरोपोंची नावे आहेत. या प्रकरणी पुढील कारवाई सुरु आहे.
इंदौर : राजा रघुवंशी हत्याकांड के चारों आरोपियों को पुलिस एयरपोर्ट लेकर पहुंची,
एयरपोर्ट पर यात्री ने राज कुशवाह पर जड़ा थप्पड़,
राज कुशवाहा विक्की चौहान आनंदपुर में आकाश राजपूत चारों आरोपी कोलकाता ले जाया जाएगा#indore pic.twitter.com/lbaK0rpEqT
— इन्दौरinfo (@indore_info) June 10, 2025
