अमेरिकेत दोन माजलेल्या हत्तींमध्ये साठमारी सुरू आहे. खरं तर याला साप मुंगसाची हाणामारी म्हटणे जास्त योग्य ठरेल. कारण हत्ती मद्य प्यायल्या शिवाय इतक्या खुन्नसने लढत नाहीत. अमेरिकेतील सत्तेची लढाई हातघाईवर आलेली आहे, आणि त्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, एका चिलटाकडून. आश्चर्य वाटेल पण सत्य आहे. या टुकार भिकार पाकिस्तानींना नको तिथे नाक खूपसण्याची सवय असते. त्याची प्रचीती या निमित्ताने पुन्हा एकदा आलेली आहे. अलिकडेच स्थापन करण्यात आलेल्या पाकिस्तान क्रिप्टो कौन्सिलच्या सीईओ पदाची जबाबदारी बिलाल बिन साकीब या तरुणाच्या खांद्यावर आहे. अवघ्या तिशीतला हा तरुण. पाकिस्तानातीलच नव्हे तर जगातील अनेक बड्या लोकांच्यासोबत याचे फोटो आहेत. पाकिस्तानचे नव्याने बढती मिळालेले फील्ड मार्शल आसिफ मुनीर, पंतप्रधान शहबाज शरीफ, तसेच अमेरिकेतले अनेक मुत्सद्दी, राजकीय नेते यांच्यासोबत या बिलाल बिन साकीबचे फोटो आपल्याला पाहायला मिळतात. पाकिस्तानने त्याला राज्यमंत्र्याचा दर्जा दिलेला आहे.
