28 C
Mumbai
Tuesday, February 20, 2024
घरविशेषगुंड शरद मोहोळ यांच्या पत्नीला धमकावणारा आरोपी रुग्णालयातून फरार!

गुंड शरद मोहोळ यांच्या पत्नीला धमकावणारा आरोपी रुग्णालयातून फरार!

पोटदुखीच्या कारणावरून ससून रुग्णालयात केले होते दाखल

Google News Follow

Related

कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी ससून रुग्णालयातून फरार झाला आहे.पोलिसांच्या हातावर तुरी देत ससून रुग्णालयातून पळ काढला आहे.मार्शल लुईस लीलाकर असे फरार झालेल्या आरोपीचे नाव असून दोन दिवसांपूर्वी त्याला पुणे शहर पोलिसांनी अटक केली होती.सोशल मीडियावरून रील्स आणि कमेंट करून शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना धमकावल्या प्रकरणी लीलाकारला अटक करण्यात आली होती.

आरोपी मार्शल लुईस लीलाकर याला अटक केल्यानंतर पोलिसांनी येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आले होते.आरोपी लीलाकरने पोट दुखत असल्याचे पोलिसांना सांगितले.त्यामुळे पोलिसांनी येरवडा जेलमधून त्याला ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले.मात्र, यावेळी मार्शल लुईस लीलाकर याने पोलिसांना गुंगारा देत पळ काढला आहे.फरार झालेल्या आरोपी लीलाकरच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी ८ पथके पाठवली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.परंतु, या प्रकरणामुळे पुन्हा एकदा पुणे पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

हे ही वाचा..

अश्विनने उधळली बुमराहवर स्तुतीसुमने!

प्रियंका गांधी यांच्या टीममधील माजी सदस्य आचार्य प्रमोद कृष्णन निलंबित!

शेतकऱ्यांचे दिल्लीला प्रयाण; हरियाणातून पंजाबला जाणारे रस्ते बंद!

हल्द्वानी हिंसाचाराला पोलिस-प्रशासनाचे दुर्लक्ष कारणीभूत!

दरम्यान, कुख्यात गुंड शरद मोहोळची काही दिवसांपूर्वी पुण्यात भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.शरद मोहोळच्या हत्येनंतर पत्नी स्वाती मोहोळला देखील जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. या प्रकरणी स्वाती मोहोळने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. स्वाती मोहोळ यांच्या तक्रारीनुसार मार्शल लुईस लीलाकर याला अटक करण्यात आली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
129,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा