संघटित गुन्हे आणि भ्रष्टाचार माहिती प्रकल्पाच्या अंतर्गत (ओसीसीआरपी) करण्यात आलेले सगळे आरोप अदानी उद्योगसमुहाने फेटाळून लावले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील आपल्या समभागांच्या व्यवहारांसाठी मॉरिशस फंडाचा वापर करण्यात आल्याच आरोप अदानी उद्योगसमुहावर ठेवण्यात आला होता. तो त्यांनी फेटाळला आहे. त्यासाठी अदानी उद्योगसमुहाने स्पष्टीकरण जाहीर केले आहे.
हिंडेनबर्ग अहवालाप्रमाणे पुन्हा एकदा अदानी उद्योगसमुहाला लक्ष्य करण्याच्या हेतूने जॉर्ज सोरोस यांचे हित लक्षात घेऊन काही परदेशी माध्यमांच्या मदतीने आमच्या उद्योगसमुहाची प्रतिम डागाळण्याचा हा प्रयत्न आहे, असे अदानी उद्योगसमुहाने म्हटले आहे.
अदानी उद्योगसमुहाने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, या आरोपांची वेळ ही संशयास्पद आहे. यातून समभागांच्या किमतीत फेरफार होतील आणि त्यातून नफा कमावता येईल असा यामागे हेतू दिसतो. पुन्हा डोके वर काढत असलेल्या या आरोपांचा आम्ही इन्कार करत असून हिंडेनबर्ग अहवालात पुन्हा एकदा प्राण फुंकण्याचा हा प्रयत्न आहे.
हे ही वाचा:
मुलांच्या वाचनाची भूक भागवतेय ‘घोडा लायब्ररी’
राज्यात नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी बृहत् आराखड्यास मान्यता
प्रिगोझिनचा विमान अपघातात मृत्यू हा पूर्वनियोजित कट
भारतात होणार पहिली ‘ग्लोबल इंडिया एआय- २०२३’ परिषद
अदानी उद्योगसमुहाने म्हटले आहे की, हे जे आरोप करण्यात आले आहेत ते १० वर्षांपूर्वीच्या प्रकरणाशी संबंधित आहेत. यासंदर्भात महसूल गुप्तचर संचालनालयाने सविस्तर चौकशी केलेली आहे. ही सगळी प्रकरणे आता बंद झालेली आहेत. एका स्वतंत्र न्यायिक संस्थेने आणि लवादाने या प्रकरणात झालेले व्यवहार हे संबंधित कायद्याच्या अधीन राहून झालेले आहेत, असे स्पष्ट केले होते. तसेच ही प्रकरणे आता सर्वोच्च न्यायालय आणि सेबी यांच्या देखरेखीखाली असल्यामुळे त्याचा सन्मान केला पाहिजे.
ओसीसीआरपी ही शोधपत्रकारितेच्या माध्यमातून भ्रष्टाचार उघड करत असल्याचा दावा करणारी संस्था आहे. सोरोस ओपन सोसायटी फाऊंडेशनच्या माध्यमातून या संस्थेला निधीचा पुरवठा होतो. तसेच रॉकेटफेलर ब्रदर्स फंडतर्फेही या संस्थेला निधी मिळतो.