29 C
Mumbai
Sunday, June 23, 2024
घरविशेषपाकिस्तानपाठोपाठ न्यूझीलंडही ढेपाळला; अफगाणिस्तानने केली मात

पाकिस्तानपाठोपाठ न्यूझीलंडही ढेपाळला; अफगाणिस्तानने केली मात

Google News Follow

Related

अबब… टी-२० विश्वचषकात नेमकं काय घडतंय. क्रिकेटचे दिग्गज संघ छोट्या संघाच्या गळाला लागत आहेत. साहजिकच नावारुपाला आलेल्या संघाचे टेन्शन वाढतानाचे काहीसे चित्र या वर्ल्डकपमध्ये पाहायला मिळत आहे. छोटे संघ मोठ्या संघावर भारी पडतानाचे चित्र दिसत असतानाच टिल्लू पिल्लू संघाच्या मनात साहजिकच लाडू फुटत आहेत. यातच आता भर पडली आहे अफगाणिस्तान संघाची. अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा ८४ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करत किवीची शिकार करत हम भी कुछ कम नही हे दाखवून दिले आहे. कर्णधार राशिद खान, फजल हक फारुकी आणि रहमानउल्ला गुरबाज यांनी अफगाणिस्तानला विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. अफगाण गोलंदाजीने कहर केला आणि न्यूझीलंडच्या फलंदाजांवर तुटून पडत एकतर्फी विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या फजलहक फारुकीने अफगाणिस्तानसाठी सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने ५६ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ८० धावा केल्या. यानंतर गोलंदाजीत फजलहक फारुकी आणि कर्णधार रशीद खान यांनी आश्चर्यकारक कामगिरी करत प्रत्येकी ४ विकेट्स घेत न्यूझीलंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ही त्यांची सर्वात मोठी चूक ठरली. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानने २० षटकांत ६ गडी गमावून १५९ धावा केल्या. गुरबाजशिवाय जद्रानने संघासाठी चांगली खेळी खेळली आणि ४१ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४४ धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना किवी संघ १५.२ षटकांत अवघ्या ७५ धावांवर सर्वबाद झाला.

न्यूझीलंडचा संघ ७५ धावांवर ऑलआऊट


१६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खूपच खराब झाली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर संघाला पहिला धक्का बसला. फझलहक फारुकीने फिन ऍलनला बोल्ड करून गोल्डन डकवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर किवी संघाने तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर डेव्हॉन कॉनवेच्या रूपाने दुसरी विकेट गमावली. कॉनवेने १० चेंडूत १ चौकाराच्या मदतीने ८ धावा केल्या. यानंतर संघाला चौथा धक्का डॅरिल मिशेलच्या रूपाने बसला. पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर फजलहक फारुकीने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मिचेलला ५ चेंडूत १ चौकार मारून केवळ ५ धावा करता आल्या.

त्यानंतर सातव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर केन विल्यमसनच्या रूपाने संघाने चौथी विकेट गमावली. विल्यमसनने १३ चेंडूत १ चौकाराच्या मदतीने ९ धावा केल्या. त्यानंतर मार्क चॅम्पमन नवव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चार धावांवर बाद झाला. चॅम्पमनला राशिद खानने बोल्ड केले. त्यानंतर पुढच्या चेंडूवर मायकेल ब्रेसवेलला भोपळाही फोडता आला नाही.

हेही वाचा :

मालाड सबवे, पाटकरवाडीत पाणी उपसा करणारे अतिरिक्त पंप बसवा

लखनऊनंतर दिल्ली, कर्नाटकात राहुल गांधींचे १ लाख घेण्यासाठी रांगा

सुरक्षा अधिकारीच हात उचलू लागले तर कोणीही सुरक्षित राहू शकत नाही

८० पैकी ६ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसची उत्तर प्रदेशात ‘धन्यवाद यात्रा’

त्यानंतर दहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर न्यूझीलंडला सातवा धक्का ग्लेन फिलिप्सच्या रूपाने बसला. त्याने १८ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने १८ धावा केल्या. यानंतर किवी संघाने मिचेल सँटनरच्या रूपाने आठवी विकेट्स गमावली. सॅन्टनरला मोहम्मद नबीने बोल्ड केले. त्यानंतर संघाची नववी विकेट तेराव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर लॉकी फर्ग्युसनने आणि दहावी विकेट सोळाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मॅट हेन्रीने घेतली. फर्ग्युसनने २ धावा आणि हेन्रीने १७ चेंडूत १ षटकाराच्या मदतीने १२ धावा केल्या.

अफगाण गोलंदाजांचा कह
अफगाणिस्तानकडून फजलहक फारुकी आणि कर्णधार राशिद खान यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतले. दोन्ही गोलंदाजांनी १७-१७ धावा केल्या. फारुकीने ३.२ षटके टाकली, तर कर्णधार रशीदने पूर्ण ४ षटके टाकली. मोहम्मद नबीने दोन विकेट घेतल्या. नबीने ४ षटकात १६ धावा दिल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
162,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा