31 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरविशेषमहाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

Google News Follow

Related

सध्या महाराष्ट्रात कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. रुग्णवाढीचा आकडा हा विक्रमी ५० हजारच्या देखील वर गेला होता. मात्र आता आज या आकडेवारी मोठी घट पहायला मिळाली आहे. आज एकूण राज्यात केवळ ३७,३२६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे सुमारे महिनाभरानंतर नव्याने कोरोनाबाधितांचा आकडा ४० हजारांच्या खाली गेला आहे. त्याबरोबरच तब्बल ६१,६०७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

आजच्या आकडेवारीनंतर राज्यात आजपर्यंत एकूण ४४,६९,४२५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  ८६.९७ टक्के झाले आहे. तर आज ५४९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा १.४९ टक्के एवढा आहे.

हे ही वाचा:

क्रिकेट बुकी जालान म्हणतो, परमबीर सिंह यांनी माझ्याकडून खंडणी उकळली

७० हजार कोटींच्या ठेवी असलेल्या पालिकेने मोफत लसीकरणाचा बोजा उचलावा

प्रफुल पटेलांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबईला मिळणार  ३०० ‘सुपर सेव्हर्स’ 

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २९,६३१,१२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५,१३८,९७३ (१७.३४ टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,६७०,३२०  क्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,६६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  राज्यात आज रोजी एकूण ५९०,८१८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबई, पुणे आणि नागपूर शहरात देखील दिलासादायक चित्र दिसू लागले आहे. मुंबईत १,७९४ रुग्णांचे निदान झाले तर ३,५८० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात १,१६५ नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत तर एकाच दिवशी ४,०१० जण बरे होऊन घरी गेले आहेत. या बरोबरच नागपूर जिल्ह्यात आज २५३० कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे (नागपूर शहर १३७१, नागपूर ग्रामीण ११४९). नागपूर जिल्ह्यात आज कोरोनामुळे ५१ मृत्यू झाले. तर आज ६,०६८ कोरोनामुक्त झाले आहेत.

मात्र भाजपाकडून या पूर्वी सातत्याने राज्यातील कमी करण्यात आलेल्या चाचण्यांचा मुद्दा उचलण्यात आला आहे. त्यामुळे कमी झालेला आकडा हा कमी झालेल्या चाचण्यांचा परिणाम तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा