31 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरविशेषगृहमंत्री अमित शहा मुंबईत 'या' गणेशोत्सवाला भेट देणार

गृहमंत्री अमित शहा मुंबईत ‘या’ गणेशोत्सवाला भेट देणार

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भाने ही भेट महत्त्वाची

Google News Follow

Related

राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. अमित शहा गणेशोत्सवाच्या काळात मुंबईला दौरा करणार आहेत. यावेळी ते मुंबईतील एका नामांकित गणेशोत्सवाला भेट देणार आहेत.

ते खासकरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशीष शेलार यांच्या घरी गणपतीचे दर्शन घेण्याबरोबरच लालबाग सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेणार आहेत.

अमित शहा २०१७ साली भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते. तेव्हापासून ते न चुकता मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे अमित शहा दर्शनाला आले नव्हते. यंदा गणेशोत्सवावर कोणतेही निर्बंध नसल्याने अमित शाह लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी गणरायाच्या दर्शनाला जाणार आहेत. त्यानंतर ते लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने अमित शहा यांचा हा दौरा महत्वाचा ठरणार आहे.

हे ही वाचा:

Twin Tower Demolition: नोएडामधले ट्वीन टॉवर कसे पाडणार? वाचा सविस्तर

पाकिस्तान ‘बुडाला’ आणीबाणी जाहीर

मुंबई नाही, तर इथे आहे एकनाथ शिंदेंचं मुख्य कार्यालय

नीरजने रचला इतिहास, डायमंड लीग जिंकणारा नीरज पहिला भारतीय

काही दिवसांपूर्वी अमित शहा राज्याच्या दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी पुणे दौरा केला होता. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे त्यावेळी त्यांनी दर्शन घेतले होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे स्वागत आणि सन्मान करण्यात आला होता. याप्रसंगी त्यांच्या हस्ते महाभिषेक आणि आरती करण्यात आली. यावेळी अमित शहा यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश करोनामुक्त होवो, आत्मनिर्भर भारताचे आपले ध्येय लवकर पूर्ण होवो अशी प्रार्थना केली. दरम्यान, अमित शहा यांच्यानंतर भाजपाचे अध्यक्ष जे.पी नड्डा हे देखील मुंबईला येणार आहेत. डिसेंबर महिन्यात जे.पी. नड्डा मुंबईला येतील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा