लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा सुरू असताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर भाषण करत होते. त्याचवेळी विरोधकांनी गोंधळ घालून चर्चेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. विरोधकांच्या या वर्तनामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह चांगलेच संतापले. विरोधकांवर निशाणा साधताना शाह म्हणाले, “त्यांना भारताच्या परराष्ट्र मंत्र्यावर विश्वास नाही, पण पाकिस्तानवर आहे. म्हणूनच ते त्या बाजूला बसलेत आणि पुढची २० वर्षं तिथंच बसणार आहेत.
अमित शाह पुढे म्हणाले, “भारत देशाची शपथ घेतलेले परराष्ट्र मंत्री इथे उभे राहून बोलत आहेत, आणि त्यांच्यावर विश्वास नाही, ही गोष्ट मला खटकते. त्यांच्या पक्षात विदेश किती महत्त्वाचा आहे हे मी समजू शकतो. पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्या पक्षाच्या सगळ्या कल्पना या सभागृहावर लादल्या जातील. भारताच्या परराष्ट्र मंत्र्यावर विश्वास नाही का? म्हणूनच ते त्या (विरोधी बाकांवर) बसलेत आणि पुढची २० वर्षं तिथंच बसणार आहेत.”
हेही वाचा..
बंगाली कुटुंबावर हल्ला केल्याचा ममता बॅनर्जींचा दावा पोलिसांनी फेटाळला!
भारत का रहने वाला हुं, भारत की बात सुनाता हुं… का म्हणाले मनीष तिवारी?
गुरुग्राममध्ये स्थलांतरित कामगाराला उलटे लटकवून काठ्यांनी मारहाण!
मेघालयात ये रे ये रे पावसा, वाहून गेला कोळसा!
शाह यांनी पुढे असेही म्हटले, “जेव्हा त्यांच्या अध्यक्षांचं भाषण सुरू होतं, तेव्हा आम्ही शांततेने ऐकत होतो. मी उद्या सांगतो त्यांनी किती खोटं बोललं. आता ते सत्यही ऐकू शकत नाहीत. मध्येच बोलणं, टोमणे मारणं – हे सगळ्यांना जमतं. असं नाही की आम्हालाच नाही जमत. पण जेव्हा एवढा गंभीर विषय असतो, तेव्हा सरकारच्या महत्त्वाच्या मंत्र्यांचं भाषण अडवणं हे विरोधकांना शोभतं का? अध्यक्ष महोदय, आपण त्यांना समजवा, नाहीतर आम्हीही नंतर आमच्या सदस्यांना थांबवू शकणार नाही.”
दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या चर्चेदरम्यान स्पष्ट केलं की, भारत दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स या भूमिकेवर ठाम आहे, विशेषतः जेव्हा तो पाकिस्तानकडून येतो. ते म्हणाले, “२२ एप्रिल ते १७ जून दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कोणताही फोन कॉल झाला नाही.







