28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेषविराट कोहलीचे क्षेत्ररक्षण पाहून आनंद महिंद्राही भारावले

विराट कोहलीचे क्षेत्ररक्षण पाहून आनंद महिंद्राही भारावले

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ न्यूटनला विचारला गमतीशीर प्रश्न

Google News Follow

Related

भारतीय फलंदाज विराट कोहलीची बॅट बेंगळुरूमध्ये तळपली नाही, मात्र त्याने क्षेत्ररक्षणात चमत्कार केला. काही चांगले चौकार विराट कोहलीने थांबवले तर, एक षटकारही रोखला. त्यानंतर एकाला धावचीत केले आणि एक झेलही घेतला. विराट कोहली याने रोखलेल्या षटकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. उद्योगपती आनंद महिंद्राही यात मागे नाहीत. त्यांनी विराटच्या या कामगिरीचे कौतुक केले आणि एक गमतीशीर फोटो ओळही दिली.

आपल्या पोस्टमध्ये महिंद्रा यांनी विराटचे छायाचित्र शेअर केले आहे, ज्यात विराट हवेमध्ये दिसून येत आहे. त्यामध्ये आनंद महिंद्रा लिहितात… ‘ हॅलो, आयझॅक न्यूटन. तुम्ही भौतिकशास्त्राच्या नव्या गुरुत्वाकर्षणविरोधी घटनेचा नियम समजावून सांगण्यास आमची मदत करू शकाल का?’ या त्यांच्या गमतीशीर पोस्टवर सगळीकडून विराटवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यावप एका यूजरने ‘ विराट कोहली याने कल्पनातीत काम केले आहे. मला अभिमान आहे की हा क्षण मी प्रत्यक्षात स्टेडिअमवर अनुभवला. त्यानंतर स्टेडिअममध्ये कोहली-कोहली नावाचा उद्घोष होत होता,’

हे ही वाचा:

प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी उत्तर प्रदेश एटीएसने तीन संशयितांना घेतलं ताब्यात

बलोच फुटीरतावाद्यांची पाकिस्तानविरोधात युद्धाची घोषणा!

‘एमपीएससी’मध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावत शेतकऱ्याच्या मुलाची बाजी

इराणची पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई; दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त

विराट कोहलीने अफगाणिस्तानची फलंदाजी सुरू असताना १७व्या षटकांत सीमारेषेवर एका हाताने झेल पकडला. मात्र त्यांना जेव्हा लक्षात आले की, ते चेंडूसह सीमेच्या पलीकडे पडतील, तेव्हा त्यांनी तो चेंडू मैदानात फेकला. त्यामुळे अफगाणिस्तानचा फलंदाज केवळ एकच धाव करू शकला. याचे कौतुक सर्वांनी केले. त्यानंतर या क्षणाला सामन्याचा टर्निंग पॉइंट मानले गेले. कारण धावसंख्या समसमान झाल्यामुळे सामना टाय झाला आणि नंतर पाठोपाठ दोन सुपर ओव्हर झाल्या. त्यात भारत जिंकला. त्यावरूनच आनंद महिंद्रा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा