33 C
Mumbai
Saturday, November 27, 2021
घरविशेष'आता जायची वेळ झाली' म्हणणाऱ्या मिस केरळचा दुसऱ्या दिवशी दुर्दैवाने झाला मृत्यू

‘आता जायची वेळ झाली’ म्हणणाऱ्या मिस केरळचा दुसऱ्या दिवशी दुर्दैवाने झाला मृत्यू

Related

दोन वर्षांपूर्वी मिस केरळ बनलेल्या अंसी कबीरने आपल्या एका व्हीडिओत ‘आता जायची वेळ झाली’ हे लिहिलेले वाक्य दुर्दैवाने तिच्याबाबतीत खरे निघाले. हा तिचा अखेरचा व्हीडिओ ठरला. एका कार अपघातात ती आणि तिची मैत्रीण तसेच मिस केरळ स्पर्धेतली उपविजेती डॉ. अंजना शजान यांचा मृत्यू झाला.

दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१९मघध्ये अंसी कबीर मिस केरळ या सौंदर्यस्पर्धेतील विजेती होती. ती आणि डॉ. अंजना अशा दोघी कारने निघाल्या होत्या. एका दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांची गाडी झाडावर आदळली आणि गाडीचे तुकडे उडाले. त्यातच या दोघींचा मृत्यू झाला. कारमध्ये आणखी दोघे होते ते जखमी आहे. दुचाकीस्वारालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अंसी आणि अंजना या तिरुवनंतपुरम येथून कोची येथे आपल्या एका प्रोजेक्टसाठी जात होत्या. त्यावेळी त्यांची कार दुचाकीस्वाराला धडकली. त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटून ती झाडावर वेगाने आदळली. कारचे या धडकेत प्रचंड नुकसान झाले. अंसी आणि अंजना यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.

 

हे ही वाचा:

जगाचा दबाव झुगारून भारताने ठरवले २०७० चे लक्ष्य

आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मालमत्तेवर टाच

उद्धव ठाकरे यांचे सल्लागार अजोय मेहता यांचा फ्लॅट केला जप्त

‘परमबीर सिंग पळून जाण्यास महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे’

 

अंसीने बनविलेल्या शेवटच्या व्हीडिओत ती एका जंगलात फिरताना दाखविली आहे. त्या व्हीडिओतील कॅप्शनमध्ये तिने म्हटले होते की, आता जायची वेळ झाली आहे. तिचे हेच वाक्य तिच्यासाठी अक्षरशः खरे ठरले. तिचा व्हीडिओ त्यामुळे खूप व्हायरल झाला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,506अनुयायीअनुकरण करा
4,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा