29 C
Mumbai
Thursday, May 19, 2022
घरविशेषमेकअप आर्टिस्ट मंगेश देसाईंच्या या सोहळ्याला का गेले अनुपम खेर?

मेकअप आर्टिस्ट मंगेश देसाईंच्या या सोहळ्याला का गेले अनुपम खेर?

Related

गेल्या अनेक दिवसांपासून भारतात ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील कलाकारांचा मेकअपही तितकाच महत्वाचा ठरला आहे. चित्रपटातील कलाकारांचा मेकअप ज्या आर्टिस्टने केला त्याचेही या चित्रपटाच्या निमित्ताने कौतुक झाले आहे.

त्यातीलच एका मेकअप आर्टिस्टच्या मुलीच्या लग्नाला आज अभिनेते अनुपम खेर यांनी उपस्थिती लावली होती. मंगेश देसाई असे ह्या मेकअप आर्टिस्टच नाव आहे. हा मेकअप आर्टिस्ट गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेते अनुपम खेर यांचा मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत आहे. काश्मीर फाइल्स या चित्रपटातील अनेक कलाकारांचे मेकअप या आर्टिस्ट ने केले आहेत. आज या मेकअप आर्टिस्टच्या मुलीचा लग्न सोहळा पार पडला. या सोहळ्याला खुद्द अभिनेते अनुपम खेर यांनी उपस्थिती लावत नवीन जोडप्याला आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या.

खेर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले, माझा मेकअप आर्टिस्ट मंगेश देसाई याची मुलगी मैथिली हिचे सत्येंद्रसोबत लग्न झाले आहे. देव नवविवाहित दाम्पत्यावर सदैव आपल्या आशीर्वादांचा वर्षाव करो! मंगेशने ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटासह अनेक कलात्मक पात्रांसाठी मेकअप आर्टिस्टचे काम केले आहे.MyStaffMyStrength म्हणजेच माझी टीम माझी ताकद आहे, असा हॅशटॅगही खेर यांनी दिला आहे.

हे ही वाचा:

‘मातोश्री’ चरणी यशवंत जाधवांचे २ कोटी आणि ५० लाखांचे घड्याळ

किरीट सोमय्या, निलेश राणे रत्नागिरी जिल्ह्यातून हद्दपार

एडविनाचा गूढ मृत्यू आणि नेहरूंची पत्र

लग्नाला निघालेली बस कोसळली दरीत

काश्मीर फाइल्स या चित्रपटात खेर यांनी पुष्कर नाथ पंडित हे पात्र साकारले आहे. या चित्रपटाला देशात खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,973चाहतेआवड दर्शवा
1,889अनुयायीअनुकरण करा
9,340सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा