30 C
Mumbai
Tuesday, May 17, 2022
घरदेश दुनियातब्बल २ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी विमाने हवेत झेपावली!

तब्बल २ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी विमाने हवेत झेपावली!

Related

सरकारने प्रदेशात प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. कोरोनाच्या संकटामुळं गेल्या दोन वर्षापासून विमानांची आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद होती. अखेर आजपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरु करण्यात आली आहेत.

मॉरिशस, मलेशिया, थायलंड, तुर्की, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, इराक आणि इतरांसह ४० देशांच्या एकूण ६० परदेशी एअरलाइन्सना भारतात मान्यता देण्यात आली आहे. तथापि, काही नवीन एअरलाइन्स आहेत ज्यात इंडिया सलाम एअर, एअर अरेबिया अबू धाबी, क्वांटास आणि अमेरिकन एअरलाइन्सचा समावेश आहे, ज्यांनी भारतासोबत विमानसेवा सुरू केली आहे.

हवाई वाहतूक नियामक DGCA ने आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे अंतिम वेळापत्रक प्रकाशित केले आहे. या वेळापत्रकानुसार परदेशी विमान कंपन्या १ हजार ७८३ साप्ताहिक उड्डाणे होणार आहते. तर भारतीय विमान कंपन्या दर आठवड्याला १ हजार ४६६ उड्डाणे चालवणार आहेत. यामध्ये मार्केट लीडर इंडिगो दर आठवड्याला ५०५ उड्डाणे, एअर इंडिया ३६१ साप्ताहिक उड्डाणे आणि तिची उपकंपनी एअर इंडिया एक्सप्रेस ३४० साप्ताहिक उड्डाणे चालवणार आहेत.

हे ही वाचा:

पुढील आठ वर्षात भारताची अर्थव्यवस्था होणार दुप्पट!

काँग्रेसच्या दिग्विजय सिंग यांना ‘या’ प्रकरणात एक वर्षाची शिक्षा!

…म्हणून चीनचे वांग यी मोदींना भेटायला आले होते!

विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताला ‘नो’ एन्ट्री

दरम्यान, भारतातील आंतरराष्ट्रीय उड्डाणे कोरोना महामारीमुळे २३ मार्च २०२० पासून बंद करण्यात आली होती. कोविड महामारीच्या पहिल्या लाटेनंतर ही उड्डाण थांबवण्यात आली कालांतराने हे निर्बंध वाढतच गेले. कोरोनाच्या संकटात काही देशांसोबत बायो-बबल व्यवस्थेअंतर्गत आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु होती. मात्र, ती मर्यादित स्वरुपातील व्यवस्था होती. त्यामुळे आजपासून भारतातून आंतरराष्ट्रीय उड्डाणे नियमितपणे सुरु होणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,978चाहतेआवड दर्शवा
1,882अनुयायीअनुकरण करा
9,320सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा