31 C
Mumbai
Friday, January 27, 2023
घरविशेषअजित पवार माफी मागा, नाहीतर महाराष्ट्रात फिरू देणार नाही

अजित पवार माफी मागा, नाहीतर महाराष्ट्रात फिरू देणार नाही

भाजपाचे राज्यभर जोरदार आंदोलन आणि घोषणाबाजी

Google News Follow

Related

नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या नामकरणावर आपली भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते. त्यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे आहे. यावरुन आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माफी मागावी, अशी मागणी जोर धरू लागली होती. परंतु अजित पवार यांनी या वक्तव्याबद्दल ना माफी मागितली ना खेद व्यक्त केला.

छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते, असं विधान केल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरोधात भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. अशातच औरंगजेब क्रूर असता तर विष्णूचे मंदिरही तोडले असते ना? असे वक्तव्य करून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नवा वाद ओढावून घेतला.

बेताळ वक्तव्य करणाऱ्या अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय जनता पार्टीने जोरदार आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. अजित पवारांनी तात्काळ माफी मागावी आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. संभाजीराजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांचा अपमान सहन करणार नाही. जर अजित पवारांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना राज्यात फिरू देणार नाही, असे आव्हानही यावेळी देण्यात आले आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोपर्यंत अजित पवार जनतेची जोपर्यंत माफी मागत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे सांगून त्यांना जाहीर इशारच दिलेला आहे. भाजप मध्य दक्षिण जिल्ह्याच्या वतीने दादर स्टेशन येथे आंदोलन करण्यात आले. अजित पवार यांचे पोस्टर हातात घेऊन निषेध केला गेला. यावेळी अजित पवार यांच्या फोटोवर गोमूत्र शिंपडण्याचा प्रयत्न भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. परंतु पोलिसांनी त्यांना अटकाव केला. औरंगाबाद येथे भाजपा युवा मोर्चाने अजित पवारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त केला.

हेही वाचा :

भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं दीर्घ आजारामुळे निधन

‘वैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्यात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे’

भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं दीर्घ आजारामुळे निधन

छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर होते आणि पुढेही राहतील, अशा शब्दांत संभाजीराजे यांनी अजित पवार यांना सुनावले आहे. अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याविरुद्ध त्यांनी निषेधही केला आहे. अजित पवार यांनी अभ्यास केल्याशिवाय बोलू नये. अजित पवारांचे विधान हे अर्धसत्य आहे. तेव्हा त्यांनी ते विधान मागे घ्यावे, अशी मागणीही संभाजीराजे यांनी केली आहे. अजित पवार यांनी कोणता ऐतिहासिक संदर्भ जोडला तेही सांगावे, असे आव्हानही संभाजीराजे यांनी दिले आहे. औरंगजेबाचा पुळका कोणाला यावा. यावरून त्यांची वृत्ती दिसून येते, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. छगन भुजबळ यांनी या विषयावर काही बोलणार नाही. त्याचा अभ्यास करतोय, असे सांगून वेळ मारून नेली.

शिवसेनेच्या सामनाच्या अग्रलेखातून अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेशी सहमत नसल्याचे म्हटले आहे. अग्रलेखात म्हटलंय की, अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्यासंदर्भात केलेल्या विधानावरून भाजपने धुरळा उडवायला सुरुवात केली आहे. संभाजीराजांचे बलिदान हे धर्मासाठीच होते याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही, पण छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केले त्या स्वराज्य रक्षणासाठीही छत्रपती संभाजीराजेंनी त्याग आणि बलिदान केले. अजित पवार म्हणतात, ‘छत्रपती संभाजीराजे स्वराज्य रक्षक होते. धर्मवीर नव्हते.’ आम्ही म्हणतो, खरा धर्मवीरच स्वराज्याचा रक्षक असतो, असे म्हणत अजित पवारांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचे सामनातून लिहिण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,920चाहतेआवड दर्शवा
1,998अनुयायीअनुकरण करा
61,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा