31.1 C
Mumbai
Tuesday, June 2, 2026
घरविशेष'हिंदू मुले मुस्लिम मुलींना सून बनवून का आणत नाहीत?' त्यांच्यात दम नाही...

‘हिंदू मुले मुस्लिम मुलींना सून बनवून का आणत नाहीत?’ त्यांच्यात दम नाही का?

अरफा खानुम, निवेदिता मेनन यांच्यातल्या चर्चेचा व्हीडिओ व्हायरल

Google News Follow

Related

पत्रकार म्हणवली जाणारी अरफा खानुम शेरवानी ही कट्टर मोदी विरोधक आणि मुस्लिम समर्थक मानली जाते. तिच्या एका मुलाखतीची क्लिप सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. अरफा खानुम शेरवानी हिने ही मुलाखत घेतली आहे, जेएनयूच्या प्रोफेसर निवेदिता मेनन यांची. यात निवेदिता मेनन यांनी मांडलेल्या विचारांमुळे कुणालाही धक्काच बसेल. एका विद्यापीठात प्रोफेसर असलेल्या या महिला अशा पद्धतीचे विचार कसे काय मांडू शकतात, असा प्रश्न कुणाच्याही मनाला शिवल्याशिवाय राहणार नाही.

अरफा निवेदिता मेनन यांना विचारते की, हिंदू मुलींनी मुस्लिम मुलेच का पसंत असतात?

त्यावर या मेनन बाई म्हणतात की, हेच हिंदू पुरुष का करू शकत नाहीत? त्यांनीही मुस्लिम महिलांना आपल्या हिंदू समाजात आणावे, त्यांना सून बनवनू आणावे. ते त्यांना का झेपत नाही? याबद्दल त्यांना शरम वाटत नाही का ? त्याउलट हिंदू मुलींना मुस्लिम मुले फूस लावतात याबद्दल ते हतबलता दर्शवतात त्याची त्यांना लाज वाटत नाही?

मेनन म्हणतात की, लव्ह जिहाद हा तुम्ही हतबल असल्याचे लक्षण आहे. त्यावरून मुस्लिम पुरुष हे आकर्षक असल्याची एक अपराधीपणाची भावना हिंदू पुरुषांत असली पाहिजे.

हे ही वाचा:

RBI च्या तिजोरीत सोन्याची मोठी चमक

भारताच्या व्यापार करारांमुळे जागतिक बाजारपेठेची दारे होणार खुली

सलमान खानने ‘काला हिरण’च्या निर्मात्यांना पाठवली कायदेशीर नोटीस

ट्रम्प नेत्यानाहूंवर संतापले; फोन करून म्हणाले, तुम्ही वेडे!

त्यावर अरफा विचारते की, असंही म्हटलं जातं की, मुस्लिम मुलगा पान खात, डोळ्यात सुरमा लावून, बाईक घेऊन एखाद्या हिंदू मुलीला आकर्षित करतो, पण मग हिंदू मुले असं का करू शकत नाहीत, असंच तुम्हाला म्हणायचं आहे का.

अरफा असंही म्हणते की, लव्ह जिहादनुसार एक मुस्लिम मुलगा हिंदू मुलीला लग्नाचे आमीष दाखवून फसवतो, पण असं हिंदू मुले करू शकत नाहीत.

त्यावर मेनन बाई निष्कर्ष काढतात की, याचा अर्थ हिंदू पुरुष हे महिलांचा तिरस्कार करतात. या हिंदू मुली मुस्लिम पुरुषांच्या मागे जातात याचा अर्थ त्यांना डोके नाही, असा अर्थ काढला जातो. जर लव्ह जिहाद आहे तर त्या मुली कुणीही सुरमा लावून, बाईकवरून आला की, त्या त्याच्यासोबत लगेच निघून जातात? याचा अर्थ हिंदू मुलींमध्ये अशी कोणती कमतरता आहे की, त्या मुली मुस्लिम मुलांसोबत पळून जातात.

या दोन महिलांच्या चर्चेचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यावर सोशल मीडियात जबरदस्त टीका होत आहे. हिंदू मुलीच मुस्लिम मुलांच्या प्रेमात कशा काय पडतात, हिंदू मुले असे प्रकार का करू शकत नाहीत, असा प्रश्न या महिलाच कशा काय विचारू शकतात, अशी विचारणा सोशल मीडियात केली जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
310,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा