26 C
Mumbai
Thursday, July 18, 2024
घरविशेषअरविंद केजरीवाल यांचे वजन घटू लागले !

अरविंद केजरीवाल यांचे वजन घटू लागले !

७० किलो वजन घटून ६२ किलो झाल्याने आपकडून चिंता

Google News Follow

Related

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेपासून त्यांची प्रकृती झपाट्याने खालावत असल्याचा दावा आम आदमी पक्षाने शनिवारी केला. दिल्ली दारू धोरण प्रकरणात २१ मार्च रोजी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केल्यापासून केजरीवाल यांचे ८ किलो वजन कमी झाल्याचा दावा आपने केला आहे.

अटकेच्या वेळी सुरुवातीला ७० किलो वजन असलेल्या केजरीवाल यांचे वजन २२ जूनपर्यंत ६२ किलोपर्यंत घसरले असे आपने म्हटले आहे. सतत वजन कमी होणे हे लक्षण गंभीर असल्यचे डॉक्टरांनी सांगितले आहे. केजरीवाल यांच्या आरोग्याच्या खालावतीचे मूळ कारण शोधण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी त्वरित आणि संपूर्ण वैद्यकीय मूल्यमापनाची आवश्यकता असल्याचे यातून स्पष्ट होते, असे आपने म्हटले आहे. आपकडून असे सांगण्यात आले आहे की केजरीवाल यांची प्रकृती खालावली आहे. सतत वजन कमी झाल्यामुळे एम्सच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केजरीवाल यांच्या आहारात ‘पराठे’ आणि ‘पुरी’ चा समावेश करण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा..

‘सामना’च्या कार्यालयाबाहेर संजय राऊतांना बॅनरमधून आव्हान!

महिला कॉन्स्टेबलसोबतची लगट भोवली!

लैंगिक अत्याचार प्रकरणी प्रज्वल रेवण्णाच्या भावालाही अटक!

पाकिस्तानच्या संसदेतही पाक कर्णधार बाबर आझम ट्रोल!

केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाची मुदत एक आठवड्यासाठी वाढवण्याची मागणी केली होती. कारण तेव्हाही अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीची तपासणी करण्याची गरज असल्याची भीती आम्हाला वाटत होती. अरविंद केजरीवाल यांचे कमी होत असलेले वजन पाहता मॅक्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी अनेक चाचण्या करण्याचा सल्ला दिला होता, असेही आपने नमूद केले आहे.

आपचा असा आरोप आहे की, केजरीवाल यांच्या काही रक्त चाचण्या केल्या गेल्या. मात्र हृदयाच्या चाचण्या आणि कॅन्सर स्क्रीनिंग चाचण्या प्रलंबित आहेत. केजरीवाल यांना मार्चमध्ये अटक करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांना सर्वोच्च न्यायालयाने २१ दिवसांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता. केजरीवाल यांनी अंतरिम जामीन आणखी वाढवण्याची मागणी केली होती, परंतु त्यांची विनंती फेटाळण्यात आली. गुरुवारी एका ट्रायल कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला पण दिल्ली उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
165,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा