26 C
Mumbai
Tuesday, July 23, 2024
घरविशेषपाकिस्तानच्या संसदेतही पाक कर्णधार बाबर आझम ट्रोल!

पाकिस्तानच्या संसदेतही पाक कर्णधार बाबर आझम ट्रोल!

निराशाजनक कामगिरीमुळे संपूर्ण देशभरात संतापाची भावना

Google News Follow

Related

टी २० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानवर गटसाखळीतच पराभूत होण्याची नामुष्की ओढवली. पाकिस्तानच्या या निराशाजनक कामगिरीमुळे संपूर्ण देशभरात संतापाची भावना आहे. याचे पडसाद पाकिस्तानच्या संसदेतही उमटले आहेत. अमेरिका आणि भारताकडून झालेल्या नामुष्कीजनक पराभवाच्या धक्क्यातून पाकिस्तानी नागरिक सावरलेले नाहीत. पाकिस्तान या स्पर्धेतून लवकर बाहेर पडल्यामुळे बाबरच्या कर्णधारपदाच्या भवितव्याबद्दल आणि त्याच्या खराब फॉर्मबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत.

क्रिकेटमधील पराभवाचे पडसाद पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या सभागृहापर्यंत पोहोचले आहेत. तिथेही बाबरला ट्रोल केले गेले. विधानसभेचे सदस्य अब्दुल कादिर पटेल यांनी एका सत्रादरम्यान बाबरला ट्रोल करण्याची संधी साधून माजी पंतप्रधान आणि माजी दिग्गज क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या २०२२मधील कृतींपासून प्रेरित एक विचित्र उपाय सुचवला. बाबरने इम्रान खानच्या नाट्यमय हावभावाची नक्कल करावी, असा विनोदी प्रस्ताव कादर यांनी मांडला. बाबरने त्याच्याविरुद्ध कट रचल्याचा दावा करून रॅलीमध्ये कागदपत्र हलवावी, असा उपाय त्यांनी सुचवला.

हे ही वाचा:

मेरठच्या तुरुंगात कैद रवी अत्री नीट पेपरफुटीचा सूत्रधार असण्याची शक्यता!

मान्सून जुलैपर्यंत वायव्य भारत व्यापेल!

वाढवण, ग्रेट निकोबारच्याविरोधाचा बोलवता धनी कोण? कोणते हिंदी आहेत, चीनचे भाई भाई

दहशतीचे लोण पश्चिम बंगालच्या राजभवनपर्यंत!

‘या क्रिकेट संघाला झालेय तरी काय. हे अमेरिकेकडूनही पराभूत झाले. हे भारताकडूनही पराभूत झाले. तेव्हा बाबर आझम यांनी त्यांच्याच ज्येष्ठ क्रिकेटपटूकडून एक धडा घ्यावा. त्याच्या प्रमाणे एक रॅली काढावी आणि तिथे कागदपत्रे फडकवून सांगावे, हा माझ्याविरोधात कट रचला जात आहे. म्हणजे वाद तिथेच संपतील,’ अशी उपहासात्मक टीका अब्दुल कादिर पटेल यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यावर एकच हशा पिकला.

२००९चा चॅम्पियन राहिलेला आणि सन २००७ व २०२२मध्ये अंतिम फेरीत धडकलेला भारतीय संघ यंदा गटसाखळीतच बाद झाला. सुरुवातीच्या सामन्यांत पाकिस्तानला अमेरिका आणि भारताने त्याला पराभूत केले. प्रमुख प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनीही संघात एकजूट नसल्याबद्दल टीका केली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
166,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा