27 C
Mumbai
Wednesday, September 28, 2022
घरविशेषमदरशातून देशविरोधी कृत्य झाले तर याद राखा

मदरशातून देशविरोधी कृत्य झाले तर याद राखा

कोणत्याही मदरशाच्या आड देशविरोधी कारवाया सुरू असल्याची आम्हाला माहिती मिळाली, तर त्या इमारती आम्ही उद्ध्वस्त करू, असे मुख्यमंत्री सरमा म्हणाले आहेत.

Related

जे मदरसे देशविरोधी कामासाठी वापरले जात आहेत ते उद्ध्वस्त केले जातील, असा इशारा आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी दिला आहे. आसाममधील बोंगाईगाव जिल्ह्यातील एक मदरसा दहशतवादी संघटना अल-कायदाशी संबंधित असल्याचा आरोप झाल्यानंतर पाडण्यात आला. या घटनेनंतर मुख्यमंत्री सरमा यांनी असा इशारा दिला आहे.

मदरसे पाडण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. हे मदरसे जिहादी गटांकडून वापरले जाऊ नये, एवढाच आमचा उद्देश आहे. कोणत्याही मदरशाच्या आड देशविरोधी कारवाया सुरू असल्याची आम्हाला माहिती मिळाली, तर त्या इमारती आम्ही उद्ध्वस्त करू, असे मुख्यमंत्री सरमा म्हणाले आहेत.

अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप आसाम मधील बोंगाईगाव येथील मदरशावर होता. पोलिसांनी हा मदरसा दहशतवादी कृतींसाठी अल-कायदाचा अड्डा म्हणून वापरल्याचा आरोप केला. यानंतर जिल्हा प्रशासनाने आठ बुलडोझरच्या मदतीने हा मदरसा पाडला. या मदरशातील मुफ्ती रहमान या शिक्षकाला अल-कायदाशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक केली. यानंतर पोलिसांनी या मदरशावर छापा टाकला. या छाप्यात अनेक प्रकारचं आक्षेपार्ह साहित्य सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे आसाम सरकारने कठोर भूमिका घेत मदरसा पाडला आहे.

हे ही वाचा:

गर्भवतीचा मृत्यू झाला आणि पोर्तुगालच्या आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा दिला

सचिननंतर मुंबईत विराटही सुरू करतोय रेस्टॉरन्ट

बॅनरला विरोध केला म्हणून मनसे कार्यकर्त्याची महिलेला धक्काबु्क्की

मोठा दिलासा, एलपीजी गॅसच्या दरात १०० रुपयांची कपात

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री सरमा यांनी राज्याबाहेरील इमामांसाठी एक नवा नियम आणला आहे. आसाम सरकार एक विशेष वेबसाइट बनवत आहे. त्या वेबसाइटवर आसामच्या बाहेरून राज्यात मदरशांमध्ये येणारे लोक किंवा इमाम यांना या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असणार असल्याची माहिती सरमा यांनी दिली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,967चाहतेआवड दर्शवा
1,941अनुयायीअनुकरण करा
40,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा