32 C
Mumbai
Sunday, June 4, 2023
घरविशेषखगोल भौतिकशास्त्रज्ञ जयंत नारळीकरांना जीवनरगौरव पुरस्कार

खगोल भौतिकशास्त्रज्ञ जयंत नारळीकरांना जीवनरगौरव पुरस्कार

पहिला 'ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया गोविंद स्वरूप' जीवनगौरव पुरस्कार प्रदान

Google News Follow

Related

पुण्यातील आयुका चे संस्थापक संचालक आणि ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाचे (एएसआय) माजी अध्यक्ष खगोलशास्त्रज्ञ प्रा. जयंत विष्णू नारळीकर हे पहिल्या ‘ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया गोविंद स्वरूप जीवनगौरव’ पुरस्काराचे सर्वोत्कृष्ट मानकरी आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला आयआयटी इंदूर येथे झालेल्या एएसआयच्या ४१ व्या बैठकीत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. मात्र, प्रा. नारळीकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी प्रवास करू शकले नाहीत. त्यानंतर एएसआयचे अध्यक्ष प्रा. दीपंकर बॅनर्जी हे स्वतः प्रा. नारळीकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी पुण्यात आले होते.

“कार्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भिन्नता असली, तरी प्रा. स्वरूप आणि प्रा. नारळीकर या दोघांनीही खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्राच्या वाढीसाठी देशात आदर्श संस्था उभारून आणि तरुण पिढीच्या प्रशिक्षणासाठी प्रचंड परिश्रम घेऊन अमूल्य योगदान दिले. हे दोघे महान संशोधकांनी भावी अनेक पिढ्यांसाठी आदर्शवत कार्य केले आहे, करत आहेत,” असे प्रा. दीपंकर बॅनर्जी म्हणाले.

“प्रा. जयंत नारळीकर यांना वर्ष २०२२ साठी भारतीय खगोलशास्त्र संस्थेच्या गोविंद स्वरूप जीवनगौरव पुरस्काराने आयुकामध्येच सन्मानित करण्यात आले, याचा आम्हाला आनंद आहे. हा खरोखरच एक खास क्षण आहे. एका पिढीतील सर्वात प्रतिभावान साधन निर्मात्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार त्याच पिढीतील सर्वात प्रेरणादायी विश्वशास्त्रज्ञाला देण्यात आला आहे,” असं आयुकाचे संचालक आर. श्रीआनंद म्हणाले.

प्रा. नारळीकर यांनी आपले जीवन ब्रह्माण्डाच्या अभ्यासासाठी समर्पित केले आहे. नारळीकर-हॉयल सिद्धांतासह खगोल भौतिकशास्त्राच्या विविध पैलूंमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. त्यांनी अनेक पिढ्यांना त्यांच्या लोकप्रिय संवाद कार्यक्रमांतून, वेगवेगळ्या ध्वनिचित्रफिती, माहितीपट आणि पुस्तकांमधून प्रोत्साहन दिले आहे. पहिल्या जीवन गौरव पुरस्काराप्रित्यर्थ प्रशस्तिपत्र , सन्मानचिन्ह आणि रोख पारितोषिक देवून डॉ.जयंत नारळीकर यांचा गौरव केला.

हे ही वाचा :

ऍसिड हल्ल्यातून बचावलेली मुलगी टॉपर

किशोर आवारे हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचे नाव

आशिष शेलार यांच्याकडून मुंबईतील नाले सफाईची पाहणी

“नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला ही चूक”

प्रा. नारळीकर हे भारतात विश्वउत्पत्ती शास्त्रामध्ये संशोधन सुरू करण्यात अग्रणी होते. त्यांनी भारतीय विद्यापीठांमध्ये खगोलशास्त्र अभ्यासक्रम आणि संशोधनाचा प्रसार करण्यासाठी एक समर्पित केंद्र तयार करण्याची कल्पना मांडली. त्यांचे हे स्वप्न ‘आयुका’च्या स्थापनेच्या रूपातून त्यांनी आपल्या परिश्रमाने साकार केले.

वर्ष २०२२ मध्ये, सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना, भारतीय खगोलशास्त्र संस्थेने (एएसआय) भारतातील खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र क्षेत्रातल्या त्यांच्या कारकिर्दीतील योगदानाबद्दल प्रख्यात भारतीय खगोलशास्त्रज्ञांना गौरवण्यासाठी गोविंद स्वरूप जीवनगौरव पुरस्काराची स्थापना केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,850चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा