28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेषलोकसभा निवडणुकीत बनावट पासपोर्ट वापरून मतदान, चार बांगलादेशींना अटक!

लोकसभा निवडणुकीत बनावट पासपोर्ट वापरून मतदान, चार बांगलादेशींना अटक!

मुंबई एटीएसची कारवाई

Google News Follow

Related

महाराष्ट्रात मुंबई एटीएसने मोठी कारवाई करत चार बांगलादेशींना अवैध कागदपत्रांसह अटक केली आहे.तसेच आणखी पाच बांगलादेशींची ओळख पटवली असून एटीएसचे पथक त्यांचा शोध घेत आहे.या आरोपींनी बनावट कागदपत्रांद्वारे मतदार ओळखपत्र बनवून लोकसभा निवडणुकी मतदान केल्याचे उघड झाले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ताब्यात घेण्यात आलेल्या चारही बांगलादेशी नागरिकांना एटीएस पथकाने मुंबईतील माझगांव कोर्टात हजर केले.यामध्ये आरोपी फारुख शेखला १४ जूनपर्यंत पोलिस कोठडी तर अन्य आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.हे सर्व बांगलादेशी नागरिक बनावट कागदपत्रे बनवून मुंबईत राहत होते.तर गुजरातमध्ये बनावट पासपोर्टचे काम करत होते.

हे ही वाचा:

‘नीट’ परीक्षा याचिकेवर सुनावणी घेत सर्वोच्‍च न्‍यायालयाने NTA ला बजावली नोटीस

कन्नड अभिनेता दर्शन थुगुडेपाला ठोकल्या बेड्या!

संजय राऊतांना पुळका, म्हणे नरेंद्र मोदींनी मुस्लीम मंत्री का नाही बनवला?

एस जयशंकर यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला; सीमा प्रश्नांवर तोडगा काढण्याचा निर्धार

रियाझ हुसेन शेख,सुलतान सिद्दीक शेख,इब्राहिम शफिउल्ला शेख आणि फारुख उस्मांगनी शेख असे अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत.हे सर्व बांगलादेशी मुंबईतील अंधेरी, मालाड,ठाणे आणि जोगेश्वरी परिसरात राहत होते.या प्रकरणी सर्व आरोपींवर एटीएसने आयपीसीच्या कलम ४६५, ४६८, ४७१, ३४ आणि भारतीय पासपोर्ट कायद्याच्या कलम १२ (१ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणात आणखी पाच बांगलादेशींची ओळख पटली असून ते सर्वजण अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा