28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरराजकारणबुधवारी चंद्राबाबू नायडू घेणार आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

बुधवारी चंद्राबाबू नायडू घेणार आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

चंद्राबाबू नायडूंच्या मंत्रिमंडळात एकूण २५ मंत्री असण्याची शक्यता

Google News Follow

Related

तेलगु देसम पक्षाचे (टीडीपी) चंद्राबाबू नायडू यांची मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे चंद्राबाबू यांचे नवे सरकार बुधवार, १२ जून रोजी स्थापन होणार आहे. चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यासंदर्भात चंद्राबाबू नायडू यांनी विजयवाडा येथील ए कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एनडीएच्या सर्व १६४ आमदारांसोबत बैठक घेतली. यावेळी चंद्राबाबू नायडूंच्या मंत्रिमंडळात एकूण २५ मंत्री असतील. यामध्ये टीडीपीचे १९, जनसेनेचे ४ आणि भाजपाचे २ मंत्री असणार आहेत.

लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेशात १७५ विधानसभा जागांवर विजय मिळवला होता. आंध्र प्रदेश विधानसभेत टीडीपीसोबत असलेल्या एनडीएने एकतर्फी विजय मिळवला होता. या निवडणुकीत टीडीपीचे १३५ आमदार, अभिनेते पवन कल्याण यांच्या जनसेनेचे २१ आमदार आणि भाजपचे ११ आमदार निवडून आले आहेत. दरम्यान, बैठकीनंतर टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू म्हणाले, भाजप, जनसेना आणि टीडीपीच्या सर्व आमदारांनी एनडीए सरकारमध्ये आंध्र प्रदेशचा पुढील मुख्यमंत्री होण्यासाठी मला संमती दिली आहे.

दरम्यान, टीडीपीचे अध्यक्ष अच्चन नायडू, भाजपचे पुरंदेश्वरी आणि जनसेनेचे पवन कल्याण हे राज्यपालांची भेट घेणार आहेत. एनडीए विधीमंडळचा नेता निवड करण्यात आल्याचा प्रस्ताव राज्यपालांना दिला जाणार आहे. यानंतर चंद्राबाबू नायडू राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत.

हे ही वाचा:

‘नीट’ परीक्षा याचिकेवर सुनावणी घेत सर्वोच्‍च न्‍यायालयाने NTA ला बजावली नोटीस

कन्नड अभिनेता दर्शन थुगुडेपाला ठोकल्या बेड्या!

संजय राऊतांना पुळका, म्हणे नरेंद्र मोदींनी मुस्लीम मंत्री का नाही बनवला?

एस जयशंकर यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला; सीमा प्रश्नांवर तोडगा काढण्याचा निर्धार

माहितीनुसार, चंद्राबाबू नायडू बुधवारी सकाळी ११.२७ वाजता विजयवाडा विमानतळाजवळ मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी कार्यक्रमात पंतप्रधान मोदीही सहभागी होणार आहेत, अशी माहिती आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा