बांगलादेशमध्ये हिंदुंवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. मागील काही दिवसांपासून रोज अशा घटना समोर येत आहेत. हिंदूंचे संरक्षण आणि कट्टरवाद्यांवर कारवाई करण्याऐवजी युनुस सरकार हातावर-हात ठेवून शांत बसले आहे. दोन दिवसांपूर्वी एका हिंदू व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. मरेपर्यंत त्याला झाडावर लटकवून ठेवले होते. महिलांना झाडाला बांधून मारण्यात येत आहे. त्यांच्यावर बळजबरीने अत्याचार केले जात आहे. अशातच आणखी एक घटना समोर आली आहे. हिंदूंची दुकाने जाळण्यात आली आहेत. तब्बल ५० दुकानांना आग लावण्यात आली आहे.
बांगलादेशातील मध्यैया बाजार पेठेतील हिंदूंच्या दुकानांवर कट्टरवाद्यांनी हल्ला चढवला. या बाजारपेठेत हिंदूंची अनेक दुकाने आहेत. जमावाने दुकानांना आग लावली. यामध्ये ५० हून अधिक हिंदूंची दुकाने जळून खाक झाली. या घटनेचे व्हिडीओ, फोटो समोर आले आहेत. बाजार पेठेत सर्वत्र आगीच्या ज्वाळा, धूर आणि हिंदू दुकानदारांचा आरडा-आरोड ऐकू येत आहेत. मागील काही दिवसांमध्ये अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे.
बांगलादेशात हिंदू समाजासह आता प्राणीही सुरक्षित नाहीयेत. कट्टरवाद्यांकडून एका श्वानाची हत्या केल्याचे नुकतेच समोर होते. नमाजाच्या वेळी त्रास होत असल्याने कट्टरवाद्यांनी श्वानाला ठार केले होते. ‘वॉइस ऑफ बांगलादेशी हिंदूस’ने ट्वीटरवर याची माहिती दिली. फासावर लटकवलेल्या श्वानाचे फोटो शेअर करत लिहिले, इस्लामवाद्यांनी या श्वानाला काफिर असल्याचा दावा करत नमाजाच्या वेळी त्रास होत असल्याने ठार मारले. बांगलादेशात प्राणीही सुरक्षित नाहीत.
BREAKING | बांग्लादेश में हिंदुओं की दुकानों पर हुआ हमला, 50 से ज्यादा दुकानें जलकर खाक@aparna_journo | https://t.co/smwhXUROiK #Bangladesh #Hindus #Shops #Destroyed #LatestNews pic.twitter.com/bF0k16TBxl
— ABP News (@ABPNews) December 31, 2024
हे ही वाचा :
येमेनकडून केरळच्या नर्सला फाशीची शिक्षा; सुटकेसाठी भारत सरकार मदत करणार
उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये सापडले ४४ वर्षांपासून बंद असलेले शिव मंदिर!
… म्हणून प्रियांका वाड्रा यांनी गृहमंत्री शाहांचे मानले आभार