27 C
Mumbai
Thursday, January 16, 2025
घरक्राईमनामापुण्यात रेल्वे उलटवण्याचा कट; रेल्वे मार्गावर सापडला गॅसने भरलेला 'सिलेंडर'

पुण्यात रेल्वे उलटवण्याचा कट; रेल्वे मार्गावर सापडला गॅसने भरलेला ‘सिलेंडर’

पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु 

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन हद्दीत रेल्वे रुळावर गॅसने भरलेला सिलिंडर सापडला आहे. रेल्वे रुळावर सिलेंडर ठेवून अपघात घडविण्याचा कट रचण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रेल्वेचे लोको पायलट शरद शहाजी वाळके (वय ३८) यांनी रेल्वे ट्रॅकवर गॅसने भरलेला सिलिंडर सापडल्याची तक्रार दाखल केली. उरुळी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोको पायलट शरद वाळके यांनी सांगितले की, रविवारी (दि. २९ ) रात्री उशिरा ते नेहमीप्रमाणे त्यांच्या परिसरातील रेल्वे रुळाची पाहणी करत होते.

हे ही वाचा : 

बांगलादेशात हिंदूंच्या दुकानांवर हल्ला, ५० हून अधिक दुकाने जळून खाक!

अखेर वाल्मिक कराड सीआयडीला शरण

भ्रष्टाचार के तीस मार खान; दिल्लीत भाजपाकडून आपविरोधात बॅनरबाजी

येमेनकडून केरळच्या नर्सला फाशीची शिक्षा; सुटकेसाठी भारत सरकार मदत करणार

याच दरम्यान, उरुळी कांचनच्या हद्दीत पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर त्यांना प्रिया गोल्ड कंपनीचा गॅस सिलेंडर भरलेला आढळून आला. शरद वाळके यांनी तत्काळ पोलिस व वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम १५०, १५२अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

लोको पायलटच्या दक्षतेमुळे हा सिलिंडर सापडला आणि मोठी दुर्घटना टळली. ही माहिती वेळीच मिळाली नसती तर रेल्वे रुळावर मोठी दुर्घटना घडू शकली असती. नववर्षाच्या मुहूर्तावर अपघात घडवण्याचा कट कोणी रचला, याचा तपास पोलीस करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा