मुस्लिम तरुणांना कट्टरपंथी बनवणाऱ्या आणि दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारल्याप्रकरणी एनआयए कोर्टाने एका बांगलादेशी व्यक्तीला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोषी जाहिदुल इस्लाम उर्फ कौसरला दरोडा, कट आणि मनी लॉन्ड्रिंग तसेच दारूगोळा खरेदीच्या आरोपाखाली ५७,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यासंबंधीच्या प्रकरणांमध्ये न्यायालयाने एकूण ११ आरोपींना दोषी ठरवले आहे.
एनआयएच्या तपासानुसार, जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) सदस्य अमीर जाहिदुल हा जेएमबी प्रमुख सलाहुद्दीन सालेहीनसह बांगलादेश पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला होता. २००५ मध्ये बांगलादेशात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी तो बांगलादेश पोलिसांच्या ताब्यात होता. तेथून पळून गेल्यानंतर तो २०१४ मध्ये बेकायदेशीरपणे भारतात दाखल झाला.
हे ही वाचा :
बांगलादेशात हिंदूंच्या दुकानांवर हल्ला, ५० हून अधिक दुकाने जळून खाक!
अखेर वाल्मिक कराड सीआयडीला शरण
भ्रष्टाचार के तीस मार खान; दिल्लीत भाजपाकडून आपविरोधात बॅनरबाजी
येमेनकडून केरळच्या नर्सला फाशीची शिक्षा; सुटकेसाठी भारत सरकार मदत करणार
एनआयएने सांगितले की, जाहिदुल इस्लाम आणि त्याचे सहकारी ऑक्टोबर २०१४ च्या बर्दवान बॉम्बस्फोट प्रकरणात सामील होते. २ ऑक्टोबर २०१४ रोजी पश्चिम बंगालमधील बर्दवानमधील खागरागड भागात एका घरात झालेल्या बॉम्बस्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला होता, तर अन्य एक जण जखमी झाला होता.
“स्फोटानंतर, जाहिदुल आणि त्याचे सहकारी बेंगळुरूला पळून गेले, जिथे त्यांनी जेएमबीच्या भारतविरोधी कारवाया पुढे नेण्यासाठी पश्चिम बंगाल आणि आसाममधील निरपराध मुस्लिम तरुणांची भर्ती करून त्यांना कट्टरपंथी बनवले. आरोपी जाहिदुल आणि त्याच्या साथीदारांनी जानेवारी २०१८ मध्ये बोधगया येथे स्फोटही घडवून आणला होता.
एनआयएच्या तपासात पुढे असे समोर आले आहे की आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी बंदी घातलेल्या संघटनेच्या जेएमबीच्या कारवाया पुढे नेण्यासाठी दरोड्याच्या माध्यमातून पैसे गोळा करण्याचा कटही रचला होता. तपास एजन्सीने सांगितले की, २०१८ मध्ये त्यांनी बेंगळुरूमध्ये चार दरोडे टाकले होते आणि लुटलेल्या पैशाचा वापर दारूगोळा खरेदी करण्यासाठी आणि दहशतवादी कारवाया करण्यासाठी, लपण्याचे ठिकाण आणि प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी केला होता. याप्रकरणी आरोपी जाहिदुल इस्लामला अटक करून ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरु आहे.