28 C
Mumbai
Thursday, November 7, 2024
घरविशेषअतुल भातखळकर 'विजयी भव'...

अतुल भातखळकर ‘विजयी भव’…

अतुल भातखळकरांनी भरला निवडणुकीचा अर्ज, स्वयंभू गणेश मंदिरापासून प्रचाराचा श्रीगणेशा

Google News Follow

Related

कांदिवली पूर्वचे भाजपचे विद्यमान आमदार अतुल भातखळकर यांनी आज (२४ ऑक्टोबर) त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. भारतीय जनता पक्षाने तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. अतुल भातखळकर यांनी गुरुवारी (२४ ऑक्टोबर) सकाळी ९ वा. गुरुपुष्यामृताचा योग साधत निवडणूकीचे नामांकन दाखल केले. यावेळी अशोकनगर पासून ठाकूर कॉम्प्लेक्स पर्यंत भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली होती.

कांदिवली पूर्वेतील स्वयंभू श्रीगणेशाचा आशीर्वाद घेवून अतुल भातखळकर यांच्या मिरवणुक रॅलीला सुरुवात झाली. यावेळी हजारोंच्या संख्येत मतदार-कार्यकर्ते, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश होता. ही भव्य मिरवणूक सकाळी ९वा. कांदिवली पूर्वमधील अशोकनगर पासून वाजत गाजत निघाली ती थेट ठाकूर कॉम्प्लेक्स मधील निवडणूक कार्यालयावर येवून थांबली. विशेष म्हणजे, उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशीच जनतेने अतुल भातखळकर यांना “विजयी भव” म्हटले. पक्षाचा विश्वास, जनतेचा आशीर्वाद आणि मिरवणुक रॅलीमधील कार्यकर्त्यांची संख्या पाहून अतुल भातखळकर तिसऱ्यांदा विजयाची पताका लावणार हे स्पष्ट आहे. 

उमेदवारी अर्ज दाखल करण्याअगोदर पत्नी रश्मी भातखळकर यांनी अतुल भातखळकर यांना मिठाई भरवत विजयासाठी शुभेच्छा दिल्या आणि अतुल भातखळकर यांना मंत्रिपद मिळावं, अशी इच्छा व्यक्त केली. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अतुल भातखळकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत मोठ्या फरकाने विजयाची खात्री दिली.

ते म्हणाले, “भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने माझ्यावर, माझ्या कामावर विश्वास दाखवला, यासाठी मी त्यांचा आभारी आहे. त्यांनी दाखवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवणार आहे. आम्ही नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या कांदिवलीच्या मतदार संघात ७० हजार मतांनी आघाडी घेतली होती, त्याआधी मागच्या विधानसभा निवडणुकीला ५३ हजाराच्या मताधिक्याने मी निवडून आलो होतो. त्यामुळे या निवडणुकीत मी १ लाखांच्या मताधिक्क्याने निवडून येईन अशी मला खात्री आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं डबल इंजिन सरकार येणार आहे आणि महाराष्ट्राच्या विकासाची गती दुप्पट होणार आहे.”

हे ही वाचा : 

जस्टिन ट्रुडो राजीनामा द्या! स्वपक्षातील खासदारांनीच केली मागणी

उबाठाला मिळालेल्या जागा पाहता खरोखरच ते युतीत सडले का?

प्रियांका गांधी यांची डोळे दिपवणारी संपत्ती, बहुधा लग्नात आहेर म्हणून आईने दिली असावी!

जम्मू- काश्मीरमध्ये १९ वर्षीय स्थलांतरित मजुरावर दहशतवादी हल्ला

कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्रात ‘शतप्रतिशत मतदान’ घडवून आणायचा संकल्प केला असल्याचे अतुल भातखळकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत सर्वाधीक तरुण कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे. ते म्हणाले, “माझ्यासोबत सर्वाधिक तरुण कार्यकर्ते काम करत आहेत, ते सुशिक्षीत, सक्षम आणि समजूतदार आहेत. त्यांच्यात जोश आणि होश दोन्ही आहे. त्यामुळे आम्ही मतदार संघात शंभर टक्क्यापर्यंत मतदान घडवून आणायचा प्रयत्न करणार आहोत. प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.”

दरम्यान, अतुल भातखळकर यांच्या मिरवणूक रॅलीला भारतीय जनता पक्ष नेते गोपाल शेट्टी, दरभंगातील भाजप खासदार गोपाल ठाकुर, शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि कांदिवली पूर्व विधानसभा समन्वयक एकनाथ शंकर हुंडारे, आरपीआयचे नेते संजय सकपाळ, भाजपा विधानसभा अध्यक्ष आप्पा बेलवलकर, विधानसभा प्रभारी सुधीर शिंदे, माजी नगरसेवक शिवकुमार झा, सुनीता यादव, सुरेखा पाटील, सागर सिंह, दक्षा पटेल, संगीता शर्मा यांसोबतच महायुतीचे स्थानिक प्रतिनिधी, आदि पदाधिकारी उपस्थित होते.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
188,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा