28 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
घरविशेषजय श्रीराम: अयोध्येत १० वर्षांत ८५ हजार कोटींचा मेकओव्हर होणार

जय श्रीराम: अयोध्येत १० वर्षांत ८५ हजार कोटींचा मेकओव्हर होणार

योजनेत १ हजार २०० एकरांवर पसरलेल्या टाऊनशिपचा समावेश

Google News Follow

Related

राम मंदिराच्या निर्माणामुळे उत्तर प्रदेशातील अयोध्या शहराचा कायापालट होत असतानाचं भविष्यात अयोध्येचे रुपडे आणखी पालटणार आहे. मास्टर प्लॅन २०३१ नुसार ८५ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीसह १० वर्षांमध्ये अयोध्येचा कायापालट पूर्ण होणार आहे. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर दररोज सुमारे ३ लाख रामभक्त येण्याची गरज पूर्ण करण्यासाठी या पावन शहराचे अपग्रेडेशन होणार आहे.

या मास्टर प्लॅनमुळे अयोध्येचा चेहरामोहरा बदलून जाणार असून या योजनेत १ हजार २०० एकरांवर पसरलेल्या वेगळ्या नवीन टाऊनशिपचा समावेश आहे, जो पुढील पाच वर्षांमध्ये सुमारे २ हजार २०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह विकसित केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ग्रीनफिल्ड टाऊनशिपची पायाभरणी करणार आहेत.

राम मंदिराच्या निर्माणानंतर लाखोंच्या संख्येने भाविक, पर्यटक अयोध्येत येणार आहेत. ही बाब लक्षात घेऊन अध्यात्मवाद, सांस्कृतिक वारसा मालमत्ता आणि राम मंदिराच्या अभिषेकनंतरच्या घटनांवर लक्ष केंद्रित करून हे शहर जागतिक पर्यटन स्थळ बनण्याची योजना तयार करण्यात आल्याची माहिती आहे. या व्हिजनमध्ये अयोध्या विकास प्राधिकरणाच्या ८७५ चौरस किमी क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा आणि पर्यटन विकासाची ओळख समाविष्ट आहे, ज्यामध्ये सध्याचे १३३ चौरस किमीचे मुख्य नियोजित शहर क्षेत्र आणि ३१.५ चौरस किमीचे मुख्य शहर समाविष्ट आहे.

आर्किटेक्ट आणि शहरी नियोजक दिक्षू कुकरेजा यांच्या कंपनीने संपूर्ण अयोध्येसाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार केले आहे. “डिझाइन व्हिजनमध्ये सर्व आधुनिक सुविधांचा समावेश आहे. ज्या सुविधा २१ व्या शतकातील जागतिक दर्जाच्या शहराकडे असणे आवश्यक आहे ते असणारचं आहे. पण, त्याच वेळी इतिहास आणि संस्कृती जपणे आवश्यक आहे,” असं ते म्हणाले आहेत. तसेच अयोध्येच्या शाश्वत नियोजनात योग्य संतुलन निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. पर्यटकांच्या मोठ्या ओघामुळे कायमस्वरूपी रहिवाशांचे जीवन विस्कळीत होणार नाही याकडे लक्ष असणार आहे. केवळ भव्य वास्तू तयार करणं हे लक्ष्य नसून त्याला वेगळेपणा मिळण्याकडेही विशेष लक्ष असणार आहे, असंही ते म्हणाले.

हे ही वाचा:

बब्बर खालसा इंटरनॅशनलचा नेता भारताकडून दहशतवादी घोषित

रशियाने युक्रेनवर १२२ क्षेपणास्रं डागली; ३१ नागरिक ठार

अभिषेक सोहळ्यापूर्वी राम मंदिराच्या प्रतिकृतीची प्रचंड विक्री!

अयोध्येत महर्षि वाल्मिकी विमानतळ, प्रभू रामचंद्रांच्या आगमनाचे चित्र!

अंदाजानुसार, राममंदिर आणि आजूबाजूच्या परिसराचा पुनर्विकास पूर्ण झाल्यानंतर शहरात रहिवासी आणि पर्यटकांचे प्रमाण हे १:१० असण्याची शक्यता आहे. ग्रीनफील्ड टाऊनशिपमध्ये राज्य अतिथी गृहे, सर्व प्रकारच्या अभ्यागतांची पूर्तता करण्यासाठी हॉटेल्स आणि आवश्यकता पूर्ण करण्यासाठी व्यावसायिक संकुलांसाठी तरतूद असेल. प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये शहरातील हेरिटेज मालमत्तेचे संरक्षण, मुख्य शहर परिसर आणि मंदिर प्रभाव क्षेत्राचा पुनर्विकास यांचा समावेश असणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
210,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा