20 C
Mumbai
Monday, January 24, 2022
घरविशेषभारताच्या संविधानाचा मसुदा ज्यावर टाईप केला त्या टाईपरायटरचे होणार जतन

भारताच्या संविधानाचा मसुदा ज्यावर टाईप केला त्या टाईपरायटरचे होणार जतन

Related

भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेल्या काही वस्तूंचे जतन करण्यात येणार आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेला ऐतिहासिक कोट, त्यांचे इतर कपडे, साहित्य आणि विशेष म्हणजे भारताच्या संविधानाचा मसुदा ज्या टाईपरायटरवर टाईप करण्यात आला त्या टाईपरायटरचेही जतन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारची संस्था नॅशनल रिसर्च लॅबोरेटरी फॉर कन्झर्वेशनऑफ कल्चरल प्रॉपर्टीज, लखनौ यांच्या तर्फे हे काम केले जात आहे.

संग्रहालयात सुमारे ३५०हून अधिक वस्तूंचा समावेश आहे. त्यापैकी आतापर्यंत ९८ वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया झाली असून प्रक्रियेनंतर या वस्तू सुमारे १०० वर्षे टिकून राहतील. नागपूरमधील मध्यवर्ती संग्रहालयातील प्रयोगशाळेत या ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया केली जात आहे.

नागपूर येथील कळमेश्वर रोडवरील चिचोलीत बाबासाहेबांच्या संकल्पनेतील बौद्ध केंद्र साकारण्याचा निर्णय घेण्यात आला; या जागेवर धम्मसेनानी वामनराव गोडबोले यांनी शांतीवन उभारले असून त्यात बाबासाहेबांनी वापरलेले कोट, छत्री, कपडे, हॅट, पेन, कंदील या वस्तूंचा संग्रह करण्यात आला आहे. मात्र, गेल्या काही काळापासून या वस्तूंना वाळवी लागत असल्याचे समोर आले आहे. भारतीय बौद्ध परिषदेने या वस्तूंचे जतन करण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्यानंतर या वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया करून जतन करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

संरक्षण करारासाठी पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे लिखाण अजरामर

पाठीवर बॅग आहे?? ​मग काळजी घ्या…वाचा सविस्तर!

…आणि डॉलरऐवजी त्याला मिळाले कागदाचे तुकडे !

शासनाकडून शांतीवन चिचोलीसाठी ४० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला असून तिथे वस्तूसंग्रहालय, मेडिटेशन सेंटर आणि अतिथी गृह उभारण्यात येणार आहे. परंतु, निधीअभावी हे काम अर्धवट आहे. राज्य सरकारनं उर्वरित निधी उपलब्ध करून दिल्यास तयार झालेल्या इमारती सर्वांसाठी खुल्या करता येतील, असे भारतीय बौद्ध परिषदेचे कार्यवाह संजय पाटील यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,588अनुयायीअनुकरण करा
5,780सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा